केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) २०१६ च्या परीक्षेचा निकाल काल, बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेत भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) अधिकारी असलेल्या नंदिनी के. आर. ही देशात पहिली आली. यावेळी तिने समाजात मुलींना ओझे मानणाऱ्यांना मोलाचा संदेश दिला आहे. मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करू नये. तुम्ही दोघांनाही समान संधी दिली तर, मुलीही पुढे जाऊ शकतात, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युपीएससी परीक्षेत देशातून पहिली आलेली नंदिनी सध्या फरिदाबाद येथील राष्ट्रीय सीमा शुल्क, उत्पादन शुल्क अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. ती मूळची कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील रहिवासी आहे. आयएएस अधिकारी होण्याचे माझे पहिल्यापासूनचे स्वप्न होते. ते आता साकार झाले आहे. हा माझा चौथा प्रयत्न होता, असे तिने सांगितले. नंदिनीचे वडील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. आई गृहिणी आहे. तासाप्रमाणे कधीही अभ्यास केला नाही. एक निश्चित लक्ष्य समोर ठेवून अभ्यास केला होता. मला कुटुंबीयांनी खूप सहकार्य केले. अनेक कठिण प्रसंगी माझे कुटुंबीय माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले, अशी प्रतिक्रियाही तिने व्यक्त केली.

मुलगी ही डोक्यावरचे ओझे असते, असे समजणाऱ्या पालकांनाही तिने मोलाचा संदेश दिला. मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करू नये. दोघांना समान संधी दिली तर मुली चांगली कामगिरी करू शकतात, असे ती म्हणाली. मुलींना संधी देणे आणि त्यांनी पुढे जाणे ही देशासाठी चांगली बाब आहे, असेही ती म्हणाली. परीक्षेसाठी चांगला अभ्यास केला होता. पण देशात पहिली येईल, असे वाटले नव्हते. तू देशात पहिली आली आहेस, असे मित्रांनी सांगितले. त्यावेळी विश्वासच बसला नाही. कदाचित ते थट्टामस्करी करत असतील, असे मला वाटले. यापूर्वीही ते अशाच प्रकारची थट्टा करत असत. पण यावेळी ते खरे ठरले, असे सांगून आपल्या यशाचे श्रेय तिने कुटुंबीयांना दिले.