केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सर्व्हिसेस फायनलचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये इशिता किशोर हिने नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.इशिता किशोरने संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे.दरम्यान, टॉपर इशिता किशोरने दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेज कॉमर्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर एका खासगी कंपनीत जोखीम सल्लागार म्हणून नोकरी केली. मात्र, भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न तिला नागरी सेवा परीक्षेकडे घेऊन आले. अशातच आता यूपीएससी टॉपर इशिता किशोर हिच्या मॉक मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती बिंधास्तपणे सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहे.
शाळेत पहिला नंबर ते देशातही अव्वल
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता इशिता मुलाखतकार यांच्यासमोर बसलेली आहे. सुरुवातीला ती स्वत:ची ओळख करून देते, यावेळी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केल्याचं ती सांगते. पुढे तिला विचारले जाते की, तुम्ही तुमच्या शाळेत अष्टपैलू होता, मग नागरी सेवेत आल्यानंतर याचा ताळमेळ कसा राखणार आहात. यावरही शितानेही स्पष्टपणे उत्तर दिले आहे. तुम्हालाही यूपीएससी क्रॅक करायची असेल तर हा व्हिडीओ पाहा अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
पाहा इशिता किशोरचा इंटरव्ह्यू
हेही वाचा – UPSC Result 2022 : नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, देशात आणि राज्यात मुलींचाच डंका
यंदा नागरी सेवा परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. अव्वल 4 स्थानांवर मुली आहेत. UPSC CSE मध्ये 2 क्रमांक मिळवणारी गरिमा लोहिया ही बिहारमधील बक्सरची रहिवासी आहे. गरिमा दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल कॉलेजमधून वाणिज्य पदवीधर आहे. त्यांनी वाणिज्य आणि खाते हे ऐच्छिक विषय घेतले होते. तर, हैदराबादमधील सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवीधर उमा हराथी एन हिने तिसरा क्रमांक मिळविला आहे. त्यांनी मानववंशशास्त्र हा ऐच्छिक विषय निवडला होता.