UPSC CSE Result 2023 : संघर्ष कोणाला चुकला आहे. प्रत्येक व्यक्तीचा संघर्ष वेगळा असतो पण प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. काही लोकांना खूप संघर्ष करूनही यश मिळत नाही पण असे लोक हार मानत नाही. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतात जोपर्यंत त्यांना यश मिळत नाही. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी संघर्ष म्हणजे काय हे चांगले माहित असते. अनेकदा खूप प्रयत्नानंतर एखाद्याला यश मिळते तर एखाद्याला यश मिळत नाही. यश मिळाणाऱ्यांचे सर्वत्र कौतूक होते पण ज्याला अपयश येते त्याला वाटत असेल याचा विचार मात्र कोणीही करत नाही.

नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२३च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला आहे. आयोगाने निवडलेल्या १०१६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण या परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची संख्या हजारोंमध्ये आहे. सर्वत्र यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतूक होत आहे पण अंतिम निवड न झालेल्या एका उमेदवारांना काय वाटत असेल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. अपयशाचा सामना करणे खूप अवघड असते पण सध्या परीक्षेत अपयशी होऊनही सकारात्मकतेने अपयाशाचा सामना करणाऱ्या एका युपीएससी उमेदवाराची पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या उमेदवाराने हसतमुखाने अपयश स्वीकारले असून त्याच्या सकारात्मक वृत्तीचे नेटकरी कौतुक करत आहेत.

UPSC परीक्षेची तयारी करणारा उमेदवार कुणाल आर विरूळकर याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपला हसरा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की , ” १२ वेळा प्रयत्न, ७ मुख्य परीक्षा, ५ मुलाखती देऊनही निवड झाली नाही.” त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो दिल्लीच्या UPSC मुख्यालया बाहेर उभा असल्याचे दिसत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिले की, “कदाचित आयुष्याचे दुसरे नाव संघर्ष आहे.” विरूळकर यांची यूपीएससी २०२२ मध्येही निवड झाली नव्हती. त्यानंतरही त्याने अशीच सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. तो स्वत:ला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा मार्गदर्शक म्हणतो.

loksatta editorial on Stampede at Mahakumbh in Prayagraj
अग्रलेख: मेजॉरिटीची मौनी ममता!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
Devendra Fadnavis expressed regret over the chaos happening in universities Nagpur news
मुख्यमंत्रीच म्हणतात, विद्यापीठांमध्ये अराजकतेचे बिजारोपण…कारण, माओवादी विचार…
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Sturggle Story
“शर्यत धावण्याची असो किंवा आयुष्याची…संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो!” चिमुकलीने केलं सिद्ध, Viral Video देतोय जगण्याची प्रेरणा
Success Story : इच्छाशक्ती! कोट्यावधीची नोकरी सोडून निवडले आयएएस पद; वाचा देशात पहिला येणाऱ्या कनिष्क कटारियाची गोष्ट

हेही वाचा –भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ

हेही वाचा – बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल

कुणालाच्या सकारात्मकता पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

कुणाल विरुळकरची बारा वेळा प्रयत्न करून परीक्षेत निवड झाली नाही. त्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांची भरपूर प्रतिक्रिया येत आहे. काहींनी त्याच्या सकारात्मक वृत्त्तीचे कौतूक केले तर काहींनी त्याला धीर दिला. एकाने लिहिले की, “संघर्षाच्या मार्गात जे काही मिळाले ते खरे यश आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “आयुष्य उरले कुठे, ते सर्व आयुष्य प्रयत्न करण्यात घालवले.” त्याचवेळी तिसऱ्या युजरने लिहिले की, “लढत राहा, आम्हाला तुमचा अभिमान आहे.”
हेही वाचा- “दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच

३५५ उमेदवारांचा निकाल तात्पुरता आहे
आयोगाने केंद्र सरकारच्या सेवांसाठी UPSC CSE Result 2023 मध्ये निवडलेल्या १०१६ उमेदवारांच्या नावांची शिफारस केली आहे. मात्र, ३५५ उमेदवारांचा तात्पुरता निकाल जाहीर झाला आहे. या उमेदवारांची पडताळणी बाकी आहे. UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे मुख्य परीक्षा २०२३ ही १५ ते २४ सप्टेंबर २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

Story img Loader