UPSC CSE Result 2023 : संघर्ष कोणाला चुकला आहे. प्रत्येक व्यक्तीचा संघर्ष वेगळा असतो पण प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. काही लोकांना खूप संघर्ष करूनही यश मिळत नाही पण असे लोक हार मानत नाही. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतात जोपर्यंत त्यांना यश मिळत नाही. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी संघर्ष म्हणजे काय हे चांगले माहित असते. अनेकदा खूप प्रयत्नानंतर एखाद्याला यश मिळते तर एखाद्याला यश मिळत नाही. यश मिळाणाऱ्यांचे सर्वत्र कौतूक होते पण ज्याला अपयश येते त्याला वाटत असेल याचा विचार मात्र कोणीही करत नाही.
नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२३च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला आहे. आयोगाने निवडलेल्या १०१६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण या परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची संख्या हजारोंमध्ये आहे. सर्वत्र यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतूक होत आहे पण अंतिम निवड न झालेल्या एका उमेदवारांना काय वाटत असेल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. अपयशाचा सामना करणे खूप अवघड असते पण सध्या परीक्षेत अपयशी होऊनही सकारात्मकतेने अपयाशाचा सामना करणाऱ्या एका युपीएससी उमेदवाराची पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या उमेदवाराने हसतमुखाने अपयश स्वीकारले असून त्याच्या सकारात्मक वृत्तीचे नेटकरी कौतुक करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा