Pune Advertising goes viral: गणेशोत्सव म्हटलं की तरुणाईचा जल्लोष येतोच. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तांमध्ये नवचैतन्य पसरते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ याच जयघोषात आज बाप्पााला निरोप दिला जाणार आहे. बाप्पाला निरोप देतानाही नाचत-गाजत मिरवणूक काढत पुढल्या वर्षी लवकर या अशी साद गणरायाला घातली जाते.गेल्या काही वर्षापासून गणेश विसर्जन मिरवणूक तासनतास निघते. लालबागचा राजा असो वा पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका तब्बल १६-१८ तास चालतात. ढोलताशे, वाद्यांच्या तालावर तरुणाई बेभान होऊन नाचते. याच मिरवणुकीसाठी आता पुणेकरांनी एक अशी जाहिरात दिलीय की वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल. ही जाहिरात सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे तिथे काय उणे

गणपती बाप्पा जसे वाजत-गाजत येतात तसेच धूमधडाक्यात जातात. लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली असून, पुण्यातील ही जाहिरात भलतीच चर्चेत आली आहे. पुणेरी स्पीक नावाच्या एका ट्विटर युजरने ही जाहिरात पोस्ट केली आणि पाहता पाहता यावर अनेकांच्या भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या. ही जाहिरात पाहून तुम्हीही म्हणाल पुणे तिथे काय उणे..

जाहिरातीत नेमकं काय लिहलंय ?

“गणपती विसर्जन गर्दीमध्ये गणपती डान्स करण्यासाठी फक्त १ दिवस दि. २७ सप्टेंबर १०० मुले मुली पाहिजेत. वय १८ ते ३०, वेळ संध्याकाळी ५ ते १० स्थळ भोसरी, पे ३०० पर डे” असं म्हणत संबंधित मोबाईल नंबर दिला आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. दरम्यान आता पुणेरी जाहिरातीचीही सगळीकडे चर्चा सुरु आहे. याच जाहिरातीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. खरं तर ही जाहिरात जुनी आहे. पण आज गणपती विसर्जनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा व्हायरल होतेय.

पाहा जाहिरात

हेही वाचा >> नाश्त्याला आवडीने पोहे खाताय? ‘हा’ प्रकार पाहून पोहे खाताना १०० वेळा विचार कराल; पाहा किळसवाणा PHOTO

पुणेकरांचा नाद नाय! 

@PuneriSpeaks नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या फोटोखाली नेटकरी वेगगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. “जेवण नाश्ता देणार का नाही?” “मधेच थांबलो तर पैसे कट? करणार का” “आला बाबुराव गाणं वाजवणार असाल तर..आम्ही स्वखर्चानी येऊ” “पुणेकरांचा नाद नाय!” “नोकरी मिळवण्यासाठी डान्स करून दाखवावा लागेल का?” अशा अनेक भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urgent vacancy for ganpati visarjan miravnuk dance in pune job advertising goes viral on social media srk