Digital Creators Awards: इन्स्टाग्राम, फेसबुक, यू-ट्युब यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भन्नाट व्हिडीओ तयार करून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या डिजिटल क्रिएटर्सच्या यादीत मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरचं नावही आता आवर्जून घेतलं जातं. हिंदी मालिका, मराठी चित्रपट आणि मालिकांत काम करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या उर्मिलाने स्वत:चा युट्यूब चॅनल सुरु केले. फॅशन, लाइफस्टाइल आणि मेकअप विषयातली मराठीतली सर्वात मोठी यूट्यूबर अशी तिची आज ओळख आहे. तसेच अनेक इंटरनॅशनल मेकअप ब्रॅंडसोबत काम करणारी पहिली मराठी एन्फ्लूएन्सर ठरली आहे. अशातच आता उर्मिला निंबाळकरला भारत सरकारच्या क्रिएटर अवॉर्डमध्ये नामांकन मिळालं आहे. विशेष म्हणजे नामांकन झालेली उर्मिला ही एकमेव मराठी क्रिएटर आहे.
उर्मिला निंबाळकर नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच उर्मिला नेहमीच व्हिडिओजच्या माध्यमातून चाहत्यांना मेकअप बद्दल, साडी नेसण्याबद्दल सजेशन देत असते. त्याचमुळे तिचे मार्गदर्शन करणारे हे व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात पाहिलेही जातात. उर्मिला निंबाळकर हीला हेरिटेज फॅशन आयकॉन पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, हेरिटेज फॅशन आयकॉन पुरस्कार म्हणजे काय? तर स्थानिक कपड्यांच्या ब्रँडचा तसेच कलेचा प्रचार करणाऱ्या क्रिएटरला हा अवॉर्ड देऊन सन्मानित केले जाते.
आपल्या आवडत्या क्रिएटरला तुम्ही खाली दिलेल्या स्टेप फॉलो करुन वोट देऊ शकता.
- mygov.in या वेबसाईटवर जा आणि तिथे Menu किंवा Activities या Option मध्ये Poll/ Survey वर क्लीक करा. त्यात Creators Award वर क्लीक करा.
- खाली Scroll करुन HERITAGE FASHION या विभागात तुम्हाला आपल्या चॅनेलचे नाव दिसेल आणि खाली LOGIN चा Option दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर OTP द्वारे आधी Login करा. तुमची बेसिक माहिती मागितली जाईल, ती द्या आणि मग तुम्हाला Password येईल त्याने login केल्यावर तुम्ही रजिस्टर व्हाल.
हेही वाचा >> केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय क्रिएटर पुरस्काराची घोषणा; २० इन्फ्लुएन्सर्सचा होणार सन्मान, कशी आहे प्रक्रिया?
- आता तुम्ही आपल्या चॅनेलला Vote करु शकता. थोडं किचकट आहे पण प्रयत्न करुन बघा आणि मत द्या.