गुडगाव येथे एक सुशिक्षित करोडपती महिला छोले-कुल्चेचा स्टॉल लावत आहे. या महिलेचे नाव उर्वशी यादव असे असून त्या हे काम आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी करत आहेत. स्वतःला उत्कृष्ट स्वयंपाकी मानणा-या या महिलेने स्वखुशीने छोले-कुल्चेचा स्टॉल लावण्याचा निर्धार केला होता. उर्वशी यांच्या पतीचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या अपघातामुळे त्यांची नोकरीही गेली. यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक दबाव आला.
यादव यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिकच हालाकीची झाली होती असेही नव्हते. उर्वशी राहत असलेल्या घराचीच किंमत तब्बल ३ कोटी इतकी आहे. तसेच त्यांच्याकडे एक SUV गाडीसुद्धा आहे.  त्यांच्या पतीच्या अपघातानंतर नातेवाईकांनीही मदतीचा हात पुढे केला होता. पण तरीही उर्वशी यांना स्वतः आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करायचे होते. या कुटुंबाकडे जमीनजुमल्याची कमतरता नाही. मात्र, रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची कमतरता भासू लागली होती. या परिस्थितीत कोणासमोर हात पसरविण्यापेक्षा उर्वशी यांनी स्वकष्टाने पैसे कमवायचे ठरविले. यानंतर त्यांनी आपल्या पतीशी चर्चा करून गुडगाव येथील सेक्टर १४ मध्ये छोले-कुल्चेचा स्टॉल लावायचे ठरविले. उर्वशी यांना आपल्या हाताची जादू केवळ स्टॉलपूरता ठेवायची नाहीये. तर त्यांना एक रेस्तराँ सुरु करण्याचीही इच्छा आहे. त्या नर्सरीमध्ये शिक्षिका म्हणूनही कार्यरत होत्या. पण त्या अजूनही शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत की नाही याबाबतची माहिती उपलब्ध नाही.

Story img Loader