मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. अगदी मुंबईत राहणारा व्यक्ती असो किंवा मुंबईमध्ये फक्त काही वेळ घालवणारा परदेशी व्यक्ती सर्वांनाच वडापावची भुरळ पडते. नुकतंच अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी आणि ब्रिटिश कमिशनर अॅलेक्स एलिस यांनी भारतातील प्रतिनियुक्ती भेटीदरम्यान देशभरातील काही महाराष्ट्रीयन पदार्थ टेस्ट केले. त्यामध्ये वडापावही होता. त्यांनाही वडपावनं चांगलंच वेड लावलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी आणि ब्रिटिश कमिशनर अॅलेक्स एलिस यांनी भारतातील प्रतिनियुक्ती भेटीदरम्यान देशभरातील काही महाराष्ट्रीयन पदार्थ आणि चव चाखल्या. गारसेटीने कोकम का शरबत, वडा पाव, साबुदाणा, भरली वांगी आणि साओजी मटण यासह इतर पदार्थांचा स्वाद घेतला, तसेच सोबतच सोल कढी आणि पुरण पोळीही खाल्ली. विशेष म्हणजे, एलिसने मसाला डोसा आणि महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड वडा पावचाही आस्वाद घेतला.त्यांना हा वडापाव इतका आवडला की त्यांनी वडापाव खातानाचा फोटो त्यांच्या व्टिटरवर शेअर केल आहे.

पाहा पोस्ट

हेही वाचा – पोट कमी करण्यासाठी लाटणं? विचीत्र व्यायामाचा video एकदा बघाच

दरम्यान राजदूत एरिक गार्सेटी यांनी ट्विटरवर गुजरात आणि महाराष्ट्रात काय खावे याबद्दल नेटकऱ्यांकडून सल्ला मागितलाय. भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अ‍ॅलेक्स एलिस यांनीही भारतीय संस्कृतीत रमण्यासाठी चित्रपटांचा आधार घेतला आहे.अलीकडेच, एलिसने त्याच्या ट्विटर फॉलोअर्सना त्यांच्या हिंदीचा सराव करण्यासाठी कोणते चित्रपट पाहावेत अशा चित्रपटांबद्दल सल्ला मागितला.

एलिसच्या यांच्या ट्विटर पोस्टमुळे नेटकरीही चकीत झाले असून जगात भारी आमचा वडपाव म्हणत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us ambassador and british high commissioner tries vada pav and puran poli srk
Show comments