अमेरिकेच्या भारतातील राजदूतपदी नियुक्ती करण्यात आलेले एरिक गार्सेट्टी (Eric Garcetti) हे दिल्लीत आले आहेत. तसेच यादरम्यान त्यांनी दिल्ली मेट्रोतून प्रवास केला. नवरात्रीत दुर्गादेवीची मूर्ती स्थापन केलेल्या मंडळालासुद्धा भेट दिली. आता त्यांनी दिवाळीही अगदीच खास पद्धतीने साजरी केली आहे आणि त्यांच्या एका डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राजदूत यांनी दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओत दिवाळी कशा प्रकारे साजरी करण्यात आली याची झलक दाखवली आहे; तर दुसऱ्या व्हिडीओत एरिक गार्सेट्टी यांचा खास डान्स दाखवला आहे. दिल्लीमध्ये दिवाळीनिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी यावेळी हिरव्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा असा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. तसेच ते स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. बॉलीवूडच्या १९९८ मधील दिल से या चित्रपटातील शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांच्या ‘छैय्या छैय्या’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स सादर करताना ते दिसले आहेत. राजदूत एरिक गार्सेट्टी यांचा हा डान्स एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
हेही वाचा…शास्त्रीय विरुद्ध पाश्चिमात्य; दोन तरुणींमध्ये रंगली डान्सची जुगलबंदी! पाहा व्हायरल व्हिडीओ
व्हिडीओ नक्की बघा :
चंदिगड विद्यापीठाचे संस्थापक सतनाम सिंग संधू यांनी राजदूत यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. राजदूत एरिक गार्सेट्टी स्कार्फ, चष्मा, कुर्ता-पायजमा घालून अगदीच पारंपरिक लूकमध्ये दिसले आहेत. या खास कार्यक्रमाला खूप सुंदर सजावट करून, रांगोळी काढण्यात आली होती. नाश्त्यासाठी समोसा होता. काही जण राजदूत यांच्यासोबत सेल्फी घेताना दिसले आणि अगदीच खास पद्धतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राजदूत गार्सेट्टीसुद्धा या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेताना दिसले.
सोशल मीडियावर हे दोन्ही व्हिडीओ @USAndindia आणि @sanatamsandhuchan यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत. अमेरिकेचे भारतातील राजदूत गार्सेट्टी यांनी दिवाळी साजरी करण्यात उत्साह दाखवल्याबद्दल त्यांचे मी कौतुक करतो. अमेरिका आणि भारताच्या नात्यात असाच आनंद कायम राहू दे, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.