एका व्यक्तीने रेस्टॉरंटमध्ये आपल्या पत्नीबरोबर जेवण करण्यासाठी गेला होता. दोघांनी जेवण केले आणि बिल मागवले. पण बिल पाहून दोघांनाही धक्काच बसला कारण त्यावर चक्क शिवी लिहिली होती आणि त्याचे पैसे देखील लावण्यात आले होते. हा सर्व प्रकार पाहून जोडपे चक्रावून गेले. त्यानी या बिलाचा फोटो Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. जे पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र जेव्हा यामागचे रहस्य उघड झाले तेव्हा कुणालाही हसू आवरता आले नाही. चला जाणून घेऊ या काय आहे प्रकरण
नक्की काय घडले?
रेड्डीटवर एका जोडप्याने त्यांच्यासह घडलेला मजेशीर किस्सा शेअर केला आहे. एक फोटो शेअर करत या व्यक्तीने लिहिले की, ‘माझ्या जेवणाच्या बिलावर माझ्यासाठी एक संदेश लिहिला गेला आहे.’ बिलामध्ये काय लिहिले आहे ते ऐकून लोक आश्चर्य व्यक्त करत आहे. नक्की असे का लिहिले असावे यासाठी सर्व प्रकारचे अंदाज लोक बांधत आहे. बिलामध्ये एकूण सहा गोष्टी दिसत आहेत, ज्यामध्ये ‘You are an A**hole’ देखील लिहिलेले आहे. त्यासाठी १५ डॉलर्स मागितले होते. आधी त्या व्यक्तीला वाटले की, वेटर कदाचित आपल्याकडून कोणत्यातरी गोष्टीचा सूड घेत असावा किंवा एखाद्या कर्मचाऱ्याने रागाच्या भरात हे कृत्य केले आहे.
हेही वाचा – नारळापासून कशी बनवतात जेली; अचंबित करणारा हा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; एकदा पाहाच …
असे उलघडले रहस्य
जेव्हा त्या व्यक्तीने याबद्दल विचारले तेव्हा त्याला समजले की, हे एका पेयाचे(Drink) नाव आहे जी त्याने आपल्या पत्नीसोबत प्यायली होते. बिल बघून तो कॉकटेलचे नाव विसरला होता. Reddit पोस्ट नंतर व्हायरल झाली. लोकही फोटोवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
लोक काय म्हणत आहेत?
एकाने म्हटले: ‘माझी इच्छा आहे की आम्ही ग्राहकांना एक **** म्हणून शुल्क आकारू शकू. भरपूर पैसे कमावले असते. दुसऱ्याने सांगितले, ‘माझ्याशी असेच गैरवर्तन केले जाते.’ तर आणखी एक जण म्हणाला, ‘असे दिसते की कॉकटेलच्या नावामुळे ते $१५ चार्ज करत आहेत.’