Dancing Dad video: बॉलिवूड हा जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे, जिथे दरवर्षी शेकडो चित्रपट बनतात. जरी अॅक्शन किंवा सायन्स फिक्शन चित्रपटांची चर्चा जोरात सुरू असली तरी बहुतेक लोकांना फक्त हॉलीवूड आवडतं. परंतु भारतातील चित्रपट देखील त्यांच्या उत्कृष्ट आणि जबरदस्त गाण्यांमुळे जगभरात ओळखले जातात. या गाण्यांचे चाहते फक्त भारतीयच नाही तर जगभरातले लोक सुद्धा आहेत. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काही लोक हे बॉलीवूड गाण्यांवर लिपसिंक करताना दिसतात, काही गाताना तर काही जबरदस्त डान्स करताना दिसतात. अशाच एका डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक विदेशी व्यक्ती बादशाहच्या सजना गाण्यावर डान्स केलाय. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे ‘रिकी पॉंड’ असं आहे. हा व्यक्ती सोशल मीडियावर ‘डान्सिंग डॅड’ म्हणूनही चर्चेत आलाय. मूळचा अमेरिकेचा असलेला रिकी अनेकदा बॉलीवूड गाण्यांवर डान्स करताना दिसतो आणि त्याचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. नुकत्याच शेअर केलेल्या या नव्या व्हिडीओमध्ये त्याने बादशाहच्या ‘सजना’ गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. या व्हिडीओमध्ये रिकी एका नव्या स्टाईलमध्ये कसा डान्स करत आहे ते तुम्ही पाहू शकता.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : महाकाय अजगर रस्ता ओलांडत होता, सर्व वाहने थांबली पण हा काही थांबला नाही
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : चक्क सापासोबत खेळायला निघाला होता, नंतर जे झालं ते पाहून तुमच्या अंगावर काटा येईल
रिकी पॉन्डने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हे गाणं खरोखरच मस्त आहे’ असं लिहून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. खरं तर, अनेकांनी रिकीला बादशाहच्या गाण्यावर वेगळ्या पद्धतीने डान्स करण्याची विनंती केली होती. यानंतर त्याचा हा जबरदस्त परफॉर्मन्स समोर आला.
आणखी वाचा : खाकी वर्दीचा धाक दाखवून आधी पॅंट साफ करायला लावली, मग कानशिलात मारली…लेडी कॉन्स्टेबलचा हा VIDEO VIRAL
‘डान्सिंग डॅड’च्या या जबरदस्त डान्स व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर सुमारे १४ हजार लोकांनी व्हिडीओला लाईक केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘गाण्याची निवड परफेक्ट आहे. या गाण्याचे बोल म्हणजे अप्रतिम आहेत…हे गाणे खूप आवडतं…आणि तुम्ही ते अजून छान पद्धतीने करून सादर केलंय.” अनेक युजर्सनी तर या व्हिडीओवर वेगवेगळे इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.