आजकाल ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. स्वयंपाकघरातील किराणा ते कपड्यांपर्यंत सर्व वस्तू ऑनलाइन विकत घेता येतात. अनेक जण आता ऑनलाइन खरेदीलाच प्राधान्य देतात. एका क्लिकवर आपल्याला हवं ते घरपोच मिळतं. आता कुणी कॉफी प्यायलाही कॅफेमध्ये जात नाही, घरी किंवा ऑफिसमध्येच मागवतात. मात्र, काही वेळा आपण ऑर्डर एक करतो आणि येते दुसरीच वस्तू. ऑर्डर दिलेल्या वस्तूंच्या बदल्यात रिकामा वा रिकामे बॉक्स आल्याचीही अनेक प्रकरणे आपण ऐकली असतील. असंच एक धक्कादायक प्रकरण पुन्हा समोर आलं आहे. एका व्यक्तीनं मिल्क शेकची ऑर्डर दिली; मात्र घरी आलं भलतंच पार्सल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागवला मिल्कशेक घरी आला लघवीने भरलेला कप

या व्यक्तीनं मिल्क शेक ऑर्डर केला होता; मात्र त्याला मिल्क शेकच्या कपामध्ये चक्क लघुशंका असल्याचे आढळलं. अमेरिकेतून हा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर सर्व जण यावर संताप व्यक्त करुत आहेत. कॅलेब वुड्स सांगतो त्यानं जेवायला सुरुवात केल्यानंतर मिल्क शेक म्हणून एक घोट प्यायला तेव्हाच त्याला शंका आली. काहीतरी वेगळं असल्याचं लक्षात येताच त्यानं मिल्क शेकचा कप उघडून पाहिला, तर त्यामध्ये लघवी होती. तो संपूर्ण कप लघवीनं भरलेला होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर मला भयंकर चीड आली.

डिलिव्हरी बॉयनं सांगितलं कारण

त्यानंतर कॅलेब वुड्सने वैतागून पुन्हा त्या डिलिव्हरी बॉयला घरी बोलावून, त्याच्यासोबत वाद घालत त्याला जाब विचारला. “त्याला मी विचारले तुला माहितीये का माझ्या मिल्क शेकच्या कपमध्ये लघवी होती?” यावर डिलिव्हरी बॉयनं त्याची चूक मान्य केली आणि माफी मागितली. तसेच त्यानंतर डिलिव्हरी बॉयनं नेमका काय प्रकार घडला याचं स्पष्टीकरणही दिलं. डिलिव्हरी बॉयनं सांगितलं की, त्याच्या गाडीमध्ये दोन सेम कप होते. एकामध्ये मिल्क शेक होतं; तर दुसऱ्यामध्ये लघवी. मला कामातून वेळ न मिळाल्यानं मी बहुतेक वेळा हे कप वापरतो. त्यामुळे माझा गोंधळ झाला आणि तुम्हाला चुकीचा कप गेला.

हेही वाचा >> आजी म्हणजे काय? दुधावरची साय…नातवानं आजीला दिलं भन्नाट सरप्राईज; VIDEO पाहून तुम्हालाही येईल आजीची आठवण

त्यानंतर कॅलेब वुड्सने तक्रार करीत रिफंडसाठी कंपनीशी संपर्क साधला असता, कंपनीनं त्याला उत्तर देण्यात चार दिवस घालवले. एवढंच नाही तर त्याला कंपनीनं पूर्णपणे रिफंडही दिला नाही. त्यानंतर कपंनीनं एक स्पष्टीकरण दिलं आहे, की डिलिव्हरी बॉयबरोबरचा करार रद्द केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us man claims he received a cup of urine instead of milkshake from grubhub shocking news viral srk
Show comments