US Man Nails Dhanushs Iconic Steps Rowday Baby Song : धनुष हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या अनोख्या अभिनय शैलीसाठी ओळखला जाणारा धनुष त्याच्या गाण्यामुळे आणि डान्स स्टेप्समुळे प्रचंड चर्चेत असतो. त्याचं ‘मारी २’ या चित्रपटातील ‘राउडी बेबी’ या गाण्याने तर धुमाकूळ घातला होता. फक्त टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्येच नव्हे तर परदेशातही या गाण्याची क्रेझ पोहोचली आहे. एका फिरंगी पठ्यानं ‘राउडी बेबी’ या गाण्यावर नाचून कमाल केली आहे. त्याचा हा डान्स व्हिडीओ एकदा पाहिलात की फक्त पाहतच रहाल, हे मात्र नक्की.

सुपरस्टार धनुषचं ‘राउडी बेबी’ हे गाणं सुपरडुपर हिट ठरलं. मारी २ या चित्रपटाच्या राउडी बेबी गाण्याने यूट्यूबवर १ अब्जपेक्षा जास्त म्हणजेचं एक कोटीपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. हे गाणं रिलीज झाल्यानंतर अगदी छोट्या मंडळींपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या गाण्यातील हूकस्टेप कॉपी करत आपले वेगवगेळे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यास सुरूवात केली होती. या गाण्याची क्रेझ अजुनही संपण्याचं नाव घेत नाही. या गाण्यावर एक अमेरिकन व्यक्तीनं इतका जबरदस्त डान्स केलाय की तो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. सीन टेनेडाइन असं अमेरिकन व्यक्तीचं नाव असून तो उत्तर कॅरोलिनामध्ये राहणारा आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम रील्सवर हा व्हिडीओ शेअर केला. हा व्यक्ती अमेरिकेचा असला तरी या व्हायरल व्हिडीओमुळे भारतीय सुद्धा त्याचे फॅन होऊ लागले आहेत.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Bobby Deol
‘जमाल कुडू’ची व्हायरल झालेल्या डान्स स्टेपमागची प्रेरणा काय? बॉबी देओल खुलासा करत म्हणाला, “मी लहान असताना…”
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच

आणखी वाचा : VIRAL VIDEO : दोरीत फसलेला व्हेल मासा मदत मागण्यासाठी मच्छीमाऱ्यांकडे आला, ‘या’ स्टाईलमध्ये ‘धन्यवाद’ म्हणाला!

या व्हिडीओची सुरूवात घरातील दारापासून होते. हा अमेरिकन व्यक्ती घराबाहेर पडताना दार लावताना दिसतो. त्यानंतर अचानक त्याच्या शेजारी राहणाऱ्या तमिळ नागरिकाच्या घरातून धनुषचं सुपरहिट सॉंग ‘राउडी बेबी’ हे गाणं ऐकू येतं. हे गाणं ऐकून त्याला या गाण्यावर डान्स करण्याची इच्छा होते. मग काय दारावरच तो या गाण्यावरचा राउडी डान्स करू लागतो. यावेळी त्याने गाण्यातील धनूषच्या डान्स स्टेप्स अगदी जशाच्या तशा कॉपी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या डान्समध्ये एनर्जी इतकी दिसली की प्रत्यक्ष धनुष सुद्धा हा डान्स व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित होईल. यावेळी हा अमेरिकन नागरिक ‘राउडी बेबी’ या गाण्यावर अगदी दिलखुलासपणे डान्स करताना दिसला.

आणखी वाचा : Chinese Rocket Debris : चीनने सोडलेलं ‘ते’ रॉकेट भारतात ‘या’ ठिकाणी कोसळलं, पाहून लोकांना घाम फुटला!, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करणारा हा कुत्रा रातोरात स्टार बनला, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर करताच बघता बघता तो व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ सध्या भारतात मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला २.४ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया शेअर त्याच्या डान्स स्टेप्सचं कौतूक करताना दिसत आहेत. यावर या अमेरिकन पठ्ठ्यानं ही युजर्सना तमिळमध्येच उत्तर दिलं, हे लोकांना फार आवडलं आहे.

Story img Loader