पुढच्या महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचारसभेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठेतरी मुस्लिम समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहेत, मुसलमान समाजाला देशांतून बाहेर काढायला हवे अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते आणि ट्रम्प यांच्या अशा अपप्रचारामुळे आपल्या ७ वर्षाचा मुलाला शाळेतील इतर विद्यार्थ्यांकडून बेदम मारहाण केली गेल्याचा आरोप एका वडिलांनी केला आहे,
झिशान -अल- हसन- उस्मानी या अमेरिकेत राहणा-या व्यक्तीने हात फ्रॅक्चर झालेल्या आपल्या ७ वर्षाच्या मुलाचा फोटो फेसबूकवर टाकला आहे. ट्रम्प यांच्या मुस्लिम विरोधी भूमिकेचा परिणाम लहान मुलांवर होत असून याच रोषातून काही शालेय मुलांनी आपल्या उस्मानी या पहिलीत शिकणा-या मुलाला बेदम मारले असल्याचे  झिशान यांनी सांगितले. फेसबुकवर त्यांनी हात फ्रॅक्चर झालेल्या आपल्या मुलाचा फोटो टाकला असून ‘माझा मुलगा फक्त मुस्लिम आहे म्हणून काही मुलांनी घरी परतत असताना शाळेच्या बसमध्ये त्याला मारहाण केल्याचे’ त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहले. विशेष म्हणजे झिशान आणि त्याची पत्नी ही दहशतवादाविरोधात लढत आहेत. आपल्या छोट्याशा मुलाला मुस्लिम असल्याने अशाप्रकारे रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे झिशान यांना इतके दु:ख झाले आहे की ते मायदेशी परतले. त्यांनी इतका टोकाचा निर्णय घेऊ नये अशीही विनंती झिशान यांना केली होती पण जोपर्यंत ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होत नाही तोपर्यंत आपण अमेरिकेत परतणार नाही असे त्यांनी सांगितले.

Story img Loader