Aldiara Doucet Hand Funeral: टीव्ही अभिनेत्री हिना खान स्तनाच्या कॅन्सरशी झुंज देतेय, या कठीण काळातही धैर्य दाखवत ती उपचार घेताना दिसतेय. तिच्याप्रमाणे अमेरिकेतील २२ वर्षीय इन्फ्ल्यूएंसर अल्दियारा डूसेट कॅन्सरशी लढा देतेय. कॅन्सरवरील उपचारादरम्याचे अनेक फोटो, व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते, जे पाहून आज अनेक कॅन्सर पीडितांना प्रेरणा मिळतेय. अल्दियारा डूसेटला दुर्मीळ कॅन्सर आहे, ज्यात तिला तिचा उजवा हात कापावा लागला. यामुळे तिच्या धाडसाचे आता कौतुक केले जात आहे. या कठीण काळातही तिने न खचता ऑपरेशन करून कापलेल्या हाताचे अंतिम संस्कार केले, ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंतील दृश्य पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर बायोनिक बार्बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डूसेटला सायनोव्हियल सारकोमा नावाच्या दुर्मीळ कॅन्सरची लागण झाली आहे, यामुळे तिला एक हात गमवावा लागला आहे. डूसेटचे फॅन फॉलोइंगदेखील खूप जास्त आहेत. सर्व काही सुरळीत सुरू असताना अल्दियारा डूसेटला तीन वर्षांपूर्वी या दुर्मीळ आजराविषयी माहिती मिळाली. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

वेदना कमी करण्यासाठी टाकला गरम पाण्यात हात

तीन वर्षे धैर्याने या आजाराचा सामना करणाऱ्या डूसेटला सुरुवातीला खूप वेदना झाल्या. अशा स्थितीत एके दिवशी असह्य वेदनांपासून आराम मिळावा म्हणून तिने उकळत्या पाण्यात हात टाकला. केमोथेरपी आणि रेडिएशन व्यतिरिक्त अनेक शस्त्रक्रिया करूनही डूसेटने तीन वर्षांच्या कालावधीत तीन वेळा कॅन्सरचा सामना केला, यामुळे कॅन्सर आजारातून बरं झाल्यानंतरही आजार पुन्हा उफाळून येण्याची भीती कायम होती. अखेर ऑक्टोबरमध्ये तिची प्रकृती खालावली, ज्यामुळे उजवा हात कोपरापासून तिला कापण्याचा निर्णय घ्यावा लागला.

कापलेल्या हाताचे केले अंतिम संस्कार

शस्त्रक्रियेपूर्वी, डूसेटने तिच्या हाताविषयी एक मोठा मेसेज लिहून कृतज्ञता व्यक्त केली आणि तिच्या आयुष्यातील त्याचे महत्त्व जाहीर केले. त्यानंतर अंतिम निरोप म्हणून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. १५ जानेवारी रोजी काळ्या पोशाखात आणि बुरखा घातलेल्या डूसेटने एक भावनिक समारंभ आयोजित केला होता, ज्यामध्ये तिने कुटुंब आणि मित्रांसह तिच्या कापलेल्या हातावर अंत्यसंस्कार केले.

तिने अंत्यसंस्कारासाठी कापलेला हात राखाडी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता, त्या हाताच्या नखांना ब्लॅक नेलपेंट लावले होती, तसेच मनगटावर लाल रंगाची गुलाबाची फुलं ठेवली होती. अखेर अंत्यसंस्कार करताना डोळे अश्रूंनी भरून आले, हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की आतापर्यंत सुमारे ५० लाख लोकांनी तो पाहिला आहे आणि डूसेटच्या धाडसाचे कौतुक केले आहे.