विद्यापीठात शिकणा-या विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण दूर करण्यासाठी अमेरिकेतल्या एका नावाजलेल्या विद्यापीठाने नव्या प्राध्यापकाला शिकवण्यासाठी बोलावले आहे. नवा प्राध्यापक म्हणजे कोण याची उत्सुकता सगळ्यांनाच होती कारण ताणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यास हे प्राध्यापक महत्त्वाची भूमिका बजावणार होते. पण हा प्राध्यापक कोणी सुटाबुटातला माणूस नाही तर तो आहे फक्त दोन वर्षांचा कुत्रा.
आश्चर्य वाटले असले तरी ही बातमी खरी आहे. लॉस एँजेलिसमधल्या कॅलिर्फोनिया विद्यापीठातील आरोग्य विभागाने मुलांना तणावमुक्त बनवण्यासाठी या नव्या प्राध्यापकाची नियुक्ती केली आहे. टायरबीटर असे या प्राध्यपकाचे नाव आहे. दिवसातून ठराविक वेळ हा कुत्रा विद्यार्थ्यांसोबत घालवणार आहे. या विद्यापीठाच्या वेबसाईटवर यासंबधीची माहिती दिली आहे. इतकेच नाही तर विद्यापीठात शिकवण्यासाठी या प्राध्यापकांना खास गणवेश देखील दिला आहे. तसेच या प्राध्यापकांना स्वत:चे विझिटींग कार्ड देखील दिले आहे. या प्राध्यपकांसोबत त्यांची साहाय्यक देखील असणार आहे.
एका कुत्र्याची प्राध्यापक म्हणून नियुक्ती करून आम्हाला विद्यापीठात बदल आणायचा होता असेही त्यांनी सांगितले. हल्ली परदेशात तणावमुक्त राहण्यासाठी डॉग थेअरपीचा वापर केला जातो. कुत्रा हा माणसाचा जवळचा मित्र मानला जातो. त्यामुळे त्याच्यासोबत वेळ घालवल्यावर माणसाच्या मनावरील ताण कमी होतो तसेच तणाव निर्माण करणारे संप्रेरक कमी करण्यासाठी देखील मदत होते. त्यामुळे कुत्र्यांच्या सनिध्यांत असलेल्या व्यक्ती या नेहमी आनंदी असतात असे एका अभ्यासातून समोर आले आहे. म्हणूनच हाच प्रयोग विद्यार्थ्यांवर करुन पाहण्यासाठी आणि त्यांना तणावमुक्त करण्यासाठी विद्यापीठाच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा