US Woman Basmati Rice Bag Viral : लक्झरी हॅण्डबॅग कोणाला आवडत नाहीत? विशेषत: महिलांना फॅशनेबल कपडे, सँडलसह हॅण्डबॅग्जही खूप आवडतात. कोणत्या कपड्यांवर कोणती हॅण्डबॅग कॅरी करायची हे स्त्रियांकडूनच शिकले पाहिजे. अगदी साडीपासून सलवार-कुर्ता ते जीन्स-टॉप, स्कर्ट-टीशर्टपर्यंत सर्व कपड्यांवर सूट होतील अशा वेगवगेळ्या हॅण्डबॅग त्या सोबत घेतात. त्यामुळे नेहमी हॅण्डबॅगचा ट्रेंड बदलताना दिसतो. परंतु, अमेरिकेसारख्या प्रगत देशातील एक महिला हॅण्डबॅगचा असा एक ट्रेंड फॉलो करतेय, जो पाहून आता भारतीयांना हसू आवरणं अवघड झालं आहे. भारतात दळण, वाणसामान आणण्यासाठी जी कापडी पिशवी वापरली जाते, अगदी तशी पिशवी घेऊन अमेरिकन महिला मार्केटमध्ये शॉपिंग करतेय. त्यामुळे भारतीयांना हा व्हिडीओ पाहून तर भरपूर हसू येईल.
हल्ली भारतातही लोक तांदळाची रिकामी गोणी किंवा पिशवी घेऊन दुकानात जायला लाजतात. पण, ही अमेरिकन महिला मात्र Gucci, Prada ची बॅग सोडून चक्क भारतीयांची ती पिशवी घेऊन, आरामात शॉपिंग करताना दिसतेय. हा फोटो पाहून आता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्ही सलूनमध्ये रॉयल बासमती तांदळाची पिशवी खांद्यावर घेऊन उभी असलेली एक अमेरिकन महिला पाहू शकता. तिची ही बॅग आता तुफान व्हायरल होत आहे.
अमांडा जॉन मंगलाथिल नावाच्या अमेरिकन इन्फ्ल्यूएन्सरने या अमेरिकन महिलेचा फोटो शेअर केला आहे. त्यात भारतीयांचे लक्ष वेधून घेत, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, अमेरिकेत काय ट्रेंड सुरू आहे. ही महिला ब्रॅण्डेड पिशवी सोडून चक्क बासमती तांदळाची पिशवी घेऊन सलूनमध्ये गेली.
अमांडा तिच्या व्हिडीओमध्ये म्हणते की, ही बॅग भारतात अगदी सहज कमी किमतीत उपलब्ध आहे. पण, सध्या अमेरिकेत या बॅगचा ट्रेंड जोरात आहे.
“ताई ही बॅग नाही, तर गोणी आहे”
https://www.instagram.com/reel/DDlnUpSxtb8/?utm_source=ig_web_copy_link१५ डिसेंबर रोजी अपलोड केला गेलेला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे; ज्यावर लोक भन्नाट कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, भारतात ही बॅग विनामूल्य उपलब्ध आहे. दुसऱ्याने लिहिले की, अरे माझे आई! ही टोट बॅग आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, ताई ही बॅग नसून गोणी आहे. गोणीचेही नशीब चमकले. आणखी एका युजरने कमेंट केली की, तांदळाची गोणी.