स्वयंपाक करताना जेवणाची चव वाढवण्यासाठी तेलाचा विविध प्रकारे वापर केला जातो. कधी तेलात काही पदार्थ तळले जातात तर फोडणीमध्ये भरपूर तेल वापरले जाते. आहारात विशिष्ट प्रमाणात तेलाची आवश्यकता असतली तरी त्याचा अतिरेकी प्रमाणात वापर करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आहारातील तेल कमी करण्यासाठी आजकाल लोक सतर्क असतात. आहारातील तेलाचे कमी प्रमाणात सेवन करतात. तेलकट पदार्थ खाणे सहसा टाळतात. अथवा तळलेले पदार्थ टिश्यू पेपरमध्ये ठेवून जास्तीचे तेल काढण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा भाजीत जास्त तेल झाल्यास बटाटा टाकण्याचा सल्ला दिला जातो. आहारातील तेल कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. पण अनेकदा विकत आणलेल्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात तेल वापरले जाते. हे तेल कसे काढावे असा प्रश्न अनेकांना पडतो. आता या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये जास्तीचे तेल काढण्याचा जुगाड सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – गॅसवर नव्हे कुकरच्या वाफेवर बनवली गरमा गरम कॉफी; विक्रेत्याचा हटके जुगाड, पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ maythesciencebewithyou नावाच्या इंस्टाग्राम अकांउटवर पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये असल्याचे दिसते. त्याच्यासमोर एका मोठे भांडे ठेवले आहे. या भांड्याचे दोन भाग आहेत ज्यामध्ये दोन वेगवेगळे पदार्थ दिसत आहे. हे पदार्थ पाहून व्हिडीओ परदेशातील असल्याचे समजते. दरम्यान एका पदार्थामध्ये अतिरेकी प्रमाणात तेल वापरल्याचे दिसत आहे. हे तेल काढण्यासाठी एक व्यक्ती बर्फ वापरताना दिसत आहे. व्यक्तीच्या हातामध्ये मोठा बर्फाचा गोळा आहे जो त्याने टिश्यू पेपरने पकडला आहे. बर्फाचा गोळा तो जास्त तेल असलेल्या पदार्थमध्ये बूडवत आहे. जास्तीचे तेल बर्फाला चिकटून कडक आवरण तयार होत आहे. ते आवरण तो व्यक्ती चमच्याने दुसऱ्या भांड्यात काढत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे. व्हिडीओ पाहून तेलाचा किती जास्त प्रमाणात वापर केला जातो हे लक्षात येते. लोकांना जास्तीचे तेल काढण्याची ही पद्धत आवडली आहे.

व्हिडीओ पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकजण म्हणतो,”तो संपूर्ण पदार्थ तेलाचा आहे.” दुसरा म्हणतो,”हे खरंच भयानक आहे” तिसरा म्हणतो, “त्यापेक्षा एवढं जास्त प्रमाणात तेल वापरणेच बंद करा”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use ice trick to remove excess oil from food is to use ice you will be surprised to see viral video snk
Show comments