आपला भारत देश हा विविध संस्कृती, परंपरांनी नटलेला आहे. जशा या सर्व गोष्टी भारताला वेगळं बनवतात, त्याचप्रमाणे अजूनही अशा काही गोष्टी आहेत की, ज्या केवळ आणि केवळ भारतातच बघायला मिळतात. सोशल मीडियावर भन्नाट आणि मजेदार गोष्टी व्हायरल होत असतात; ज्या लोकांचं लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक व्यक्ती भररस्त्यावरून सामानानं भरलेली रेल्वे चालवताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये ट्रॅक्ट्ररला काही हातगाड्या जोडून ही भलीमोठी आगगाडी तयार केल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे ही आगगाडी चक्क रस्त्यावरून धावते आहे. एक व्यक्ती ट्रॅक्ट्रर चालवताना दिसत आहे आणि नीट पाहिलं, तर लक्षात येईल की, बोगीमध्ये काही माणसं उभी आहेत. या आगगाडीवर भरपूर सामान असूनदेखील ती अगदी सहज चालवता येत आहे, असे दिसते.

हेही वाचा : McDonald’s मधून मुलांसाठी मागवलेल्या खाद्यपदार्थामध्ये आढळलं असं काही…, पाहून महिलेला बसला धक्का

व्हायरल व्हिडीओ रेडीट्टवर subreddit या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेकांच्या प्रतिक्रियादेखील येत आहेत. हा व्हिडीओ ‘ओन्ली इन इंडिया’ अशा लहान; पण लक्ष वेधून घेणाऱ्या कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओनं सोशल मीडिया वापरकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Only in India
byu/LimpCoco inindiasocial

त्यापैकी एकानं लिहिलं, “बुलेट ट्रेन अवतरली आहे.” तर दुसऱ्यानं, “ खूपच कमाल कल्पना आहे”, असं लिहिलं आहे.

“बघायला गेलं, तर भरपूर नियम तोडले जात आहेत”, अशी प्रतिक्रिया एकानं दिली; तर दुसऱ्याला “ही गाडी कशी वळेल,” असा प्रश्न पडलेला आहे.
काही लोकांनी हा व्हिडीओ भोपाळमधील आहे, असं निदर्शनास आणून दिलं. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि ३.५ हजारपेक्षा जास्त लोकांनी तो लाईक केला आहे.

हेही वाचा : “…मी त्याची मस्तानी मीच त्याची काशी….” बायकोने उखाण्यातून थेट सांगितले, VIDEO होतोय व्हायरल

लोकांना आश्चर्यचकित करणारा हा काही पहिला व्हिडीओ नाही. आजपर्यंत लोकांनी गच्च भरलेल्या प्रवासी गाड्यांपासून ते चित्र-विचित्र पोस्टर्स व बॅनर्स अशा अनेक गोष्टी काही क्षणांतच व्हायरल होत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच एका माणसानं आपल्या खाट वापरून कार बनवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्यावसायिक आनंद महिंद्रानी तो शेअर केला होता.

Story img Loader