जगभरातील लोक गूगल मॅप्स ही सेवा वापरतात. अनोळखी ठिकाणी पहिल्यांदा प्रवास करताना आपण सगळेच गूगल मॅपचा उपयोग करतो. या ॲपच्या मदतीने ठराविक ठिकाणावरील रस्ते, आजूबाजूचा परिसर यांची माहिती मिळते. त्यामुळे याचा वापर आता जगभरात होऊ लागला आहे. पण, आज सोशल मीडियावर काही तरी वेगळंच पाहायला मिळालं आहे. एक व्यक्ती गूगल मॅपचा उपयोग करून संकटात अडकली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पायऱ्यांवर गाडी घेऊन उभी आहे. सांगण्यात येत आहे की, गूगल मॅपचा वापर केल्यामुळे व्यक्तीची टोयोटो एसयूव्ही पायऱ्यांवर अडकली. हे पाहून उपस्थित पोलीस कर्मचारी आणि स्वयंसेवक पथकांच्या मदतीने गाडीला सुखरूप खाली उतरवण्यात आले. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…Mumbai Police: ट्रॅकसूटचा उपयोग करून बनवले स्ट्रेचर! मुंबई पोलिसांनी जखमी गिर्यारोहकाची केली मदत

व्हिडीओ नक्की बघा :

प्रकरण असं आहे की, कर्नाटकात पोहोचण्यासाठी एक व्यक्ती गुगल मॅपचा वापर करते. पण, प्रवास करताना गूगल मॅपचा उपयोग करून व्यक्ती तामिळनाडूतील डोंगराळ शहरामध्ये पोहचते आणि एसयूव्हीसह पायऱ्यांवर अडकून राहते . या व्यक्ती बरोबर तिचा मित्र देखील गाडीत उपस्थित असतो; असे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ एक्स (ट्विटर) @awesh अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी व्यक्तीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच काही जण त्यांचा प्रवासा दरम्यानचा गूगल मॅपचा अनुभव शेअर करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत आणि सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Using google maps man reach karnataka ended up stuck on a flight of stairs with his vehicle asp
Show comments