मोबाईल ही गरज राहिली नसून आता ते व्यसन झाले आहे आणि या व्यसनापासून आपली सुटका करून घेणे हे जवळपास अशक्यच होत चालले आहे. त्यामुळे जिथे जाऊ तिथे आपल्याला सोबत मोबाईल लागतोच. जेवताना, झोपताना सतत मोबाईल अनेकांना जवळ हवा असतो. हद्द म्हणजे अनेक जण अगदी टॉयलेटमध्येही मोबाईल घेऊन जातात. पण अशी वाईट सवय तुम्हाला असेल तर ती वेळीच सोडलेली बरी.

वाचा : सोन्याचा कमोड वापरण्यासाठी लोक तासन् तास रांगेत उभे

एका सर्व्हेक्षणातून असे लक्षात आले आहे की अनेक मोबाईल धारक टॉयलेटमध्येही मोबाईल सोबत घेऊन जातात. पण असे करणे सर्वाधिक धोकादायक ठरू शकते. मोबाईल कमोडमध्ये पडण्याची भिती असतेच पण त्याचबरोबर यामुळे तुमच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. शौचायल ही सर्वाधिक अस्वच्छ जागा असते. डोळ्यांना न दिसणारे आणि आजार पसरवणारे जंतू येथे असतात. अशा ठिकाणी मोबाईल ठेवल्यास हे जंतू तुमच्या मोबाईलला चिकटतात. टॉयलेट पेपर, स्प्रे अशा अनेक ठिकाणी हे जंतू अधिक असतात. आपण शौचालयातून बाहेर येतो तेव्हा हात स्वच्छ धूतो पण मोबाईल मात्र साफ करणे शक्य नसते. त्यामुळे हे जंतू पुन्हा आपल्या हाताला चिकटतात म्हणूनच टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाणे ही सवय अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. तेव्हा ही सवय वेळीच सोडलेली बरी.

वाचा : स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा

वाचा : तुम्हाला सतत मोबाईल व्हायब्रेट होण्याचा भास होतो का?

Story img Loader