Shocking video: चालता-बोलता, नाचताना किंवा जिममध्ये अचानक लोकांचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजकाल समोर येत राहतात. अनेकदा हा मृत्यू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतो आणि त्याचे व्हिडिओही समोर येतात. हैराण करणारी बाब म्हणजे, अशा घटनांमध्ये बहुतांश पीडित हे तरुण असतात आणि त्यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असतं. आता अशीच काहीशी आणखी एक घटना समोर आली आहे. हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला आणि जीव गेला. याच दरम्यान उत्तर प्रदेशातून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. उत्तर प्रदेशातील एटा येथे लग्नात नाचताना एका १५ वर्षाच्या मुलाचा कोसळून मृत्यू झाला. भावाच्या लग्न समारंभात नाचत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. हे सगळं अचानक घडल्यानं आनंदी लग्नाच्या उत्सवाला गंभीर वळण मिळाले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरात लग्नसमारंभ असला की नाच, गाणे आलंच. याचप्रकारे याठिकाणीही लोक डीजेवर नाचत होते. यामध्ये अनेक तरुण नाचताना दिसत आहेत, यावेळी त्यातला एक १५ वर्षीय मुलगा नाचता नाचता खाली कोसळतो आणि त्याचा मृत्यू होतो. व्हिडिओमधील बाकी तरुण मृत तरुणाच्या मदतीसाठी धावताना दिसत आहेत. पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: कधी सुधारणार हे लोक! भटक्या कुत्र्यांना घेऊन जाणाऱ्या गाडीतून सोडलं मोकाट; तरुणाचं हे कृत्य कितपत योग्य ?

या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून @SachinGuptaUP नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत. एका युजरने पुढे लिहिले की, सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी जिवंत घरी परत येईल असा दावा कोणीही करू शकत नाही. हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.