तुम्ही नेहमी ऐकले असेल की, आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या आंनदासाठी आई-वडील काहीही करू शकतात. पण एखाद्या पालकांवर आपल्या मुलाला विकण्याची वेळ येत असेल तर यापेक्षा वाईट काय असू शकते? उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये धक्कादायक प्रकार समोल आला आहे.
एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, अलीगढमध्ये वसुली करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका वडिलांवर आपल्या मुलाची विक्री करण्याची वेळ आली आहे. आपल्या ११ वर्षाच्या मुलाला भरचौकात विक्री करताना एक व्यक्ती दिसत आहे. पत्नी आणि मुलगा आणि मुलीसह गांधी पार्क बस स्टँडवर भर चौकात बसलेले आहेत. त्यांनी आपल्या गळ्यामध्ये एक पोस्टर लटकवले आहे. “माझा मुलगा विक्रीसाठी उपलब्ध आहे, मला मुलाला विकायचे आहे. मुलांची किंमीत सहा ते आठ लाख रुपये लावली आहे.
महुआखेडा क्षेत्रातील असदपुर कयाम परिससरातील हे प्रकरण आहे. पीडित व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी एक जमीन खरेदी केली होती ज्यासाठी त्यांनी एका व्यक्तीकडून काही पैसे उधार घेतले होते.पीडित व्यक्तीचे म्हणणे आहे की, कर्ज दिल्याच्या काही दिवसांनंतर त्याने त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी कर्जाच्या पैशांच्या वसुली करण्यासाठी जमीनीचे कागज घेतेले आणि बँकेकडे घाण ठेवून त्यावर कर्ज घेतले.
हेही वाचा – ‘आयुष्य खूप सुंदर आहे फक्त…’ स्वत:च्याच लग्नात मनसोक्त नाचत होती नवरी; भन्नाट डान्स व्हिडीओ एकदा पाहाच..
मालमत्तेचे कागदपत्र बळकावले
पीडित व्यक्तीने आरोप केला आहे की, “मला नामालमत्ता मिळाली आणि ना माझ्या हातामध्ये एकही रुपया शिल्लक राहिला. आता कर्जाची वसुली करणारा व्यक्ती सतत पैशांसाठी दबाव टाकत आहे. त्याने आधी ई- रिक्षा बळकावली ज्याआधारे मी माझ्या कुटुंबाचे पोट भरतो”
मुलीला सांभळण्यासाठी मुलाला विक्री करतोय हा व्यक्ती
या व्यक्तीने सांगितले की, “आपल्या मुलाला विकण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नाही जेणेकरून तो कर्ज फेडू शकेल, कोणीतरी त्याच्या मुलाला ६ ते ८ लाखांमध्ये खरेदी करावे तर तो आपल्या मुलीला व्यवस्थित सांभाळू शकतो आणि तिचे लग्न लावू शकतो.”
हेही वाचा – टायरवर चढवले टायर, जुगाड करून तयार केली चारचाकी बाइक; Viral Video पाहून लोकांनी उडवली खिल्ली
पोलिसांनी केली मध्यस्थी
मुलाची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या व्यक्तीला पोलिस ठाण्यात घेऊन आले. तेव्हा त्या पीडित व्यक्तीने आपल्या नातेवाईकाकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले जो तो फेडू शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी कर्ज देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांनाही समजावले. पीडित व्यक्तीने सांगितले की, तो हळू हळू पैसे परत देईल ज्यानंतर दोघांमधील प्रकरण शांतते सोडविण्यात आले.