उत्तर प्रदेशातील बरेलीच्या महापालिका आयुक्त आयएएस निधी गुप्ता यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अस्वच्छता पाहून त्यांनी स्वतः फावडे घेऊन नाला साफ केली आहे. हे पाहून तेथे उपस्थित अधिकाऱ्यांमध्येही एकच गोंधळ उडाला.
महापालिका आयुक्त आयएएस निधी गुप्ता यांच्याकडे शहरातील सुरेश शर्मा नगरमधील अस्वच्छतेच्या तक्रारी येत होत्या. नुकतंच त्या स्वत: पाहाणी करण्यासाठी बाहेर पडल्या असता, त्यांना त्याठिकाणी प्रचंड अस्वच्छता आणि गलिच्छ नाला दिसला, जो कचऱ्याने भरलेला होता. हे पाहून पालिका आयुक्त संतप्त झाल्या आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना खडसावले. दरम्यान नगर आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या हातातून फावडे घेऊन नाल्यात साचलेली घाण काढण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी जबाबदार लोकांनाही फटकारले आहे, त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानंतर नाल्यांच्या साफसफाईचा प्रकार उघडकीस आला होता. नाल्यांमधील अस्वच्छतेमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही आणि लोकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण होते. याबाबत शहर आयुक्तांकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. तक्रारी आल्यानंतर महापालिका आयुक्त निधी गुप्ता यांनी स्वत: घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: महाविनाशकारी ‘अणुबॉम्ब’ स्फोटोचा व्हिडीओ पाहून पोटात येईल गोळा, क्षणात सगळं नाहीसं
महापालिका आयुक्त त्याठिकाणी पोहोचल्या तेव्हा तेथे आधीच काही अधिकारी आणि सफाई कर्मचारी होते. अस्वच्छता पाहून त्यांना राग आला आणि त्यांनी कर्मचाऱ्याच्या हातातून फावडे घेतले आणि स्वत: नाला साफ करण्यास सुरुवात केली. तिथे उपस्थित लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला जो सध्या व्हायरल होत आहे.