भारतीय लष्कराच्या जवानाला तिकीट तपासणीसाठी आलेल्या टीसीने (TTE) धावत्या रेल्वेतून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बरेली रेल्वे स्टेशनवर घडलेल्या या घटनेत जवानाचा एक पाय निकामी झाल्याचंही समजतं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बरेली रेल्वे स्थानकात गुरुवारी सकाळी फलाट क्रमांक दोनवर दिब्रुगड-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये सुपक बुरे नावाच्या टीसीचा भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या जवानासोबत तिकीटावरुन वाद झाला.
आणखी वाचा- निष्काळजीपणा नडला; तब्बल ५ वर्ष कानातच अडकून पडला इयरबड, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का
या वादात रागवलेल्या टीसीने जवानाला थेट रेल्वेतून खाली ढकलून दिलं. टीसीने दिलेल्या धक्क्यामुळे जवान थेट रेल्वेखाली गेला आणि त्यातच त्याचा एक पाय निकामी झाला आहे. जखमी जवानावर सध्या सैनिकी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.
आणखी वाचा- निष्काळजीपणा नडला; तब्बल ५ वर्ष कानातच अडकून पडला इयरबड, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी या घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले, फुटेजमधील दृश्यानुसार आरोपी टीसी सध्या फरार झाला असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागाचे वरिष्ठ वित्त व्यवस्थापक सुधीर सिंग यांनी दिली. तर आरोपीविरोधात आयपीसी कलम ३०७ नुसार हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं रेल्वे पोलिस स्टेशन अध्यक्ष अजित प्रताप सिंह यांनी दिली आहे.