उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. योगी यांनी शाह यांच्या निवासस्थानी दीड तास चर्चा केली. योगी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अचानक आखण्यात आलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या या दिल्ली दौऱ्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये उलटसुटल चर्चांना सुरुवात झालीय. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर राज्यात नेतृत्वबदल होणार का?, योगी विरुद्ध मोदी असा काही वाद आहे का?, या दौऱ्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी सोशल नेटवर्किंगवर मागील काही दिवसांपासूनच सोशल नेटवर्किंगवर पंतप्रधान मोदी आणि योगींमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
खरोखरच पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांमध्ये काही मतभेद आहेत का हा प्रश्न उपस्थित होण्यामागील महत्वाचं कारण म्हणजे सोशल नेटवर्किंगवर सुरु असणाऱ्या चर्चा. भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांनी योगींना ५ जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन योगींना शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर या दोन्ही नेत्यांमध्ये काही मतभेद आहेत का अशी चर्चा सुरु झाली. खास करुन भाजपा विरोधकांकडून असा प्रश्न विचारला जात असल्याचं दिसून येत आहे.
नक्की वाचा >> “युपीमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडतायत, कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह नेले जातायत आणि योगी All Is Well म्हणतायत”
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे समर्थक आणि नेत्यांनाही यासंदर्भात शंका उपस्थित केल्यात. काही दिवसांपूर्वी तर #ModiVsYogi हा टॉप ट्रेंडींग टॉपिक होता. आम आदमी पार्टीचे नेते आणि समर्थक असे ट्विट करण्यामागे मागे नाहीयत. भाजपाने मात्र हा हॅशटॅग आणि मोहीम म्हणजे उत्तर प्रदेश निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी रचलेला डाव असल्याचं म्हणत मोदी आणि योगींबद्दल केले जाणारे दावे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीच्या सुल्तानपुर माजरा येथील आपचे आमदार मुकेश अहलावत यांनी मोदी आणि योगींचा एक फोटो ट्विट केलाय. यामध्ये मोदी आणि योगी एकमेकांकडे पाहताना दिसत आहे. अहलावत यांनी या फोटो शेअर करत, या फोटोला कॅप्शन द्या, असं म्हटलं आहे.
Caption this pic.twitter.com/LP9ftjEXWO
— Mukesh Ahlawat (MLA) (@mukeshahlawatap) June 8, 2021
आपचे समर्थक सुजीत सचान यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा हसणारा फोटो ट्विट केला आहे. #ModiVsYogi ट्रेंड पाहून आडवाणीजींची पहिली प्रतिक्रिया ही असेल असं म्हणत हा फोटो सुजीत यांनी शेअर केलाय.
After watching #ModiVsYogi
Advani ji:- pic.twitter.com/IC0NTKPUo4
— Sujeet Sachan AAP(@sujeetsachan27) June 8, 2021
बॉलिवूड गायिका कारलिसा मॉन्टिरोने (Caralisa Monteiro) सध्या चर्चेत असणाऱ्या ‘द फॅमेली मॅन टू’मधील चेल्लम सरांचा फोटो ट्विट केलाय. “मोदी आणि योगींदरम्यान काय सुरु आहे हे केवळ चेल्लम सरांना ठाऊक आहे,” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आलीय.
The only man who knows what’s happening between #ModiVsYogi.#ChellamSir pic.twitter.com/xK1DyFaU3E
— Caralisa Monteiro (@runcaralisarun) June 8, 2021
नक्की वाचा >> नायट्रोजनपासून ऑक्सिजन बनवण्याबद्दल भाष्य केल्याने योगी ट्रोल; लोक म्हणाले, ‘नावं बदलून बघा’
सिद्धार्थ सेतिया यांनी #ModiVsYogi ट्रेंडमध्ये दोन फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये एकीकडे उत्तर प्रदेश भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरील बॅनर फोटोवर पंतप्रधान मोदींचा फोटो दिसत नसल्याचं त्याने म्हटलं आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये मोदी भावूक झाल्याचं दिसत आहे.
ActionReactionpic.twitter.com/StTlkq6pWv
— Siddharth Setia (@ethicalsid) June 8, 2021
ऐश्वर्या वर्मा यांनी मिर्झापूर सीरिजमधील हम भी पेले गयें थे, तुम भी पेले जाओगे, असं म्हणणारं मीम शेअर केलं आहे.
After seeing this #ModiVsYogi
Adwnai ji to Modi Ji pic.twitter.com/BVUYHefrxe
— Aishwary (@AishwaryVerma9) June 8, 2021
दरम्यान, सोशल नेटवर्किंगवर या चर्चा सुरु असल्या तरी योगींच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवली जाण्याची शक्यता अधिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढील आठ महिन्यांनी, फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून योगींची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे. २०१७ मध्ये भाजपने राज्यात मोठे यश मिळवून सत्तापरिवर्तन घडवले होते. पाच वर्षांनंतर ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून त्यासाठी पक्ष संघटना सक्रिय केली जात आहे.
नक्की वाचा >> गोरखपूर मंदिरात योगी आदित्यनाथांनी केला रुद्राभिषेक; पंडित म्हणाले, ‘यामुळे करोनाचा नाश होईल’
काही दिवसांपूर्वी भाजपचे संघटना महासचिव बी. एल. संतोष यांनी लखनौला भेट देऊन प्रदेश भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती. दिल्लीत परत आल्यावर, उत्तर प्रदेशमध्ये योगी हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे ट्वीट संतोष यांनी केले व राज्यात नेतृत्वबदलाच्या शक्यता फेटाळल्या. उत्तर प्रदेशचे प्रभारी राधामोहन सिंह यांनीही मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे सांगितले.