Viral Video : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. अनेक शेतकरी वर्षभर शेतात राबतात, कष्ट करतात पण अनेकदा त्यांच्या पिकांचे नुकसान होते. कधी पावसामुळे तर कधी वन्यजीव प्राण्यांमुळे.
सध्या उत्तर प्रदेशच्या काही भागात शेतांमध्ये काही माकडं पिकांची नासधूस करत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांनी एक तोडगा काढला आहे. त्यांचा हा तोडगा सध्या चांगलाच चर्चेत आहे.
हेही वाचा : फोनवर बोलत वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं, कार चालकाचा Video व्हायरल
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील जहान गावात माकडांनी केलेल्या पिकांच्या नासधूसीमुळे शेतकरी त्रासलेले होते. या यावर उपाय म्हणून शेतात बुजगावणे उभारण्याऐवजी अस्वलाचा पोशाख परिधान करुन शेतकरी स्वत:च शेतात फिरत आहे. पिकांना माकडांपासून वाचवण्यासाठी या गावातील लोकांनी पैसे जमवून चार हजार रुपयांचे अस्वलाचे पोशाख खरेदी केले आहे.
हेही वाचा : भावाने एक फटका मारला अन् बहिणीने धरून हाणला! व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल तुमचे बालपण
एएनआयने यासंबंधीत ट्विट करत अस्वलाचा पोशाख परिधान केलेल्या व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक युजर्स शेतकऱ्यांच्या या भन्नाट युक्तीचे कौतुक करत आहे.