Uttar Pradesh Viral Video : उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील एका व्हायरल व्हिडीओनं खळबळ माजवली आहे. बन्नादेवी परिसरातील नवीन राजेंद्र नगरमधील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कथित भूत कैद झाल्याचं बोललं जात आहे. या भुताचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असल्याची जोरदार चर्चा रंगू लागलीय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक अनेक तर्क वितर्क लावत असून याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाहीय. हा खळबळजनक व्हिडीओ ट्विटरवर शेअर होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सर्वांना थक्क करणारा हा व्हिडीओ @DineshKumarLive नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. येथील परिसरात भूताच्या व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे. अलीगढच्या बन्नादेवी येथील राजेंद्र नगरमधील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर फुटेज एडिटेड असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. एक व्यक्ती रात्रीच्या सुमारास फिरत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण या फुटेजमध्ये वेळ आणि तारीख दिसत नाहीय.
इथे पाह व्हिडीओ
त्यामुळे इंटरनेटवर या व्हिडीओबाबत अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडीओ एडिटेड असल्याच्या प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं, “भाऊ रात्रीच्या वेळी अशाप्रकारचे ट्विट करु नका. भीती वाटते.” एका अन्य नेटकऱ्याने म्हटलं, “कुणीतरी भयानक विनोद केला आहे.” अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, मी तर अशाप्रकारची एडिटिंग कधी पाहिली नाही.”