प्रवास करताना टोलनाक्यावर अनेकदा वाहनचालकांचे कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून टोल कर्मचाऱ्यांबरोबर वाद होतात. यावेळी टोल कर्मचारी चालकांबरोबर गैरवर्तनाचा प्रयत्न करतात. अशावेळी वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद होतात. पण, काही झाले तरी टोल कर्मचारी चालकाला टोलचे पैसे देऊनच सोडतात. अशाचप्रकारे एका टोल नाक्यावर एका बुलडोझर चालकाला टोल भरण्यासाठी म्हणून टोल कर्मचाऱ्यांनी थांबवले, ज्यामुळे बुलडोझर कर्मचाऱ्याला खूप राग आला; ज्यानंतर त्याने बुलडोझरच्या मदतीने टोल नाक्याची अशी काही अवस्था करून ठेवली की पाहून तुम्हाला धक्का बसेल. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील हापूरमधील टोल प्लाझावरील आहे. टोल नाक्यावर टोल मागितल्याने बुलडोझरचालकाला इतका राग आला की, त्याने आपल्या बुलडोझरने टोल प्लाझावरील दोन बूथ तोडून टाकले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. टोल कर्मचाऱ्यांनी दिल्ली-लखनौ हायवे NH-9 वरील छाजरसी टोल प्लाझा येथील टोल बूथवरून जाणाऱ्या बुलडोझरचालकाकडून टोलचे पैसे मागितले, यावरून बुलडोझरचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली.

टोल कर्मचाऱ्यांच्या वागण्याने बुलडोझरचालक इतका संतापला की, त्याने बुलडोझरच्या सहाय्याने दोन टोलनाके उद्ध्वस्त केले. या प्रकरणातील विशेष म्हणजे बुलडोझरचालक टोल प्लाझा पाडत असताना घटनास्थळी उपस्थित कर्मचारी व्हिडीओ बनवत होते आणि कोणीही पोलिसांना फोन करण्याची तसदी घेतली नाही.

तरुणांसाठी खूशखबर! सेबीमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती; ३० जूनपर्यंत करू शकता अर्ज

या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या घटनेवर आपली बाजू मांडणारे टोल व्यवस्थापक अजित चौधरी यांनी सांगितले की, टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी जेसीबी चालकाकडून टोल आकारणी मागितली असता त्याने शिवीगाळ सुरू केली आणि जेसीबीच्या धडकेने दोन टोलनाके तोडले. त्यामुळे तेथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तुटले असून बरेच नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी जेसीबी चालकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून लवकरच गुन्हाही दाखल केला जाईल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बुलडोझरचालक अतिशय रागाने टोल प्लाझावरील दोन टोल बूथ जेसीबीच्या मदतीने पाडतोय, यात टोल बूथच्या काचा, सीसीटीव्ही, टीव्ही आणि इतर अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.