तुम्ही अनेकदा लोकांना एखाद्या गोष्टीचा निषेध करताना किंवा त्यांच्या काही मागण्या मांडताना पाहिलं असेल. अनेकवेळा लोक मागण्या मान्य न झाल्यास लगेच आक्रमक होतात आणि सरकार किंवा प्रशासनावर नाराज होऊन मोबाईल टॉवरवर चढतात. जे अत्यंत धोकादायक आहे. सध्या असंच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे एक २० वर्षीय तरुणीही टॉवरवर चढली आहे. मात्र तिची मागणी एकून तुम्हीही डोक्याला हात लावाल. बॉयफ्रेंडनं लग्न करावं म्हणून ती चक्क मोबाईल टॉवरवर चढली आहे. या प्रकरणाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील आहे, जिथे एका २० वर्षीय तरुणीने मोबाईल टॉवरवर चढून तिच्या प्रियकराला लग्नाची मागणी घातली आहे. तरुणीने आरोप केला आहे की, तिच्या २४ वर्षीय प्रियकराने तिची फसवणूक केली आहे. आणि तिच्याशी लग्न करण्यास नाकार देत आहे. तरुणी मोबाईल टॉवरवर चढल्याची माहिती मिळताच प्रशासनाशी संबंधित लोक घटनास्थळी पोहोचले.
तरुणीला खाली आणण्यात यश
तरुणीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. ही मुलगी महाराजगंज जिल्ह्यातील सेमरा राजा टोल प्लाझा परिसरातील मोबाईल टॉवरवर चढली होती. पोलिस अधिकारी लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला जमिनीवर परत आणण्यासाठी बचाव कार्य सुरू केले, अखेरीस तिला सुखरूप खाली आणण्यात यश आले.
तरुणी खाली आल्यानंतर तिनं प्रियकराविरुद्ध एफआयआर दाखल केली. तसेच त्या तरुणावर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा >> “ये लोकल दादरसे बँड्रा…” भारतीय तरुणानं अमेरिकेतील ट्रेनमध्ये दिल्या भारतीय रेल्वेच्या सूचना; VIDEO झाला व्हायरल
प्रियकर फरार
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर सध्या फरार असून, पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. मुलगा नेपाळला काही कामानिमित्त गेला असल्याचा दावा तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून मुलगी टॉवरवर का चढली हा चर्चेचा विषय बनला आहे.