महाभारतातील कर्णाचे औदार्य सर्वांनाच माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला आजच्या काळातला मॉडर्न कर्णबद्दल सांगणार आहोत. या मॉडर्न कर्णने आपल्या ५० वर्षाच्या मेहनतीने मिळवलेली तब्बल ६०० कोटींची संपत्ती गरिबांना दान करण्याचा निर्णय घेतलाय. स्वतःला राहण्यासाठी केवळ घर ठेवलंय. यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. सोशल मीडियावर सध्या या मॉडर्न कर्णची जोरदार चर्चा आहे. ही बातमी ऐकल्यानंतर लोक या मॉडर्न कर्णबद्दल माहिती घेताना दिसून येत आहेत.

यूपीच्या मुरादाबादमध्ये राहणारे हे दानवीर उद्योगपती डॉ. अरविंद कुमार गोयल यांनी आपली ६०० कोटी रुपयांची संपत्ती गरीबांच्या शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांसाठी राज्य सरकारला दान करण्याची घोषणा केली आहे. आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून डॉ. अरविंद कुमार गोयल यांनी फक्त मुरादाबाद येथील सिव्हिल लाइन्सचा बंगला त्यांच्याकडे ठेवला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पॅराशूटला विमान लटकवत जमिनीवर उतरवून पायलटने आपला जीव वाचवला!

डॉ. अरविंद गोयल यांनी जिल्हा दंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत नक्की काय झालं हे सांगण्यात आले नाही. गोयल म्हणाले, समाजातील एकही गरीब आणि निराधार व्यक्ती शिक्षण आणि औषधापासून वंचित राहू नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांना आता आपले उर्वरित आयुष्य देश आणि समाजसेवेसाठी समर्पित करायचे आहे. गेल्या काही वर्षांपासून ते सातत्याने समाजसेवेच्या कामातही हातभार लावत आहेत.

आणखी वाचा : रेल्वे रूळ ओलांडताना धाड्धाड् ट्रेन नव्हे मृत्यूच येत होता! अंगावर काटा आणणारा VIRAL VIDEO पाहाच

डॉ.अरविंद यांनी मुरादाबाद जिल्ह्यातील ३८ गावे दत्तक घेतली आहेत. तिथल्या सरकारी शाळांमध्ये फर्निचर आणि कॉम्प्युटर बसवण्याबरोबरच ते इतरही मदत करतात. या गावांतील गरजूंसाठी ते औषधांची व्यवस्था करत आहेत. देशभरात त्यांच्या १५० हून अधिक शाळा सुरू आहेत. काही रुग्णालये सुरू आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : डोक्यावर इमारतीचा भाग कोसळणार तितक्यात जिगरबाज बापाने जीवाची बाजी लावून लेकाला वाचवलं…

त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा समाजसेवेच्या कामात वापरला जातो. मालमत्तेची संपूर्ण यादी आणि त्याचे मूल्य अंदाज मंगळवारपासून सुरू होईल. ते पूर्ण होताच मालमत्ता कर शासनाच्या नावे केला जाईल. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरविंद गोयल यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. अरविंद गोयल यांची मुरादाबादमधील टॉप १० व्यावसायिकांमध्ये गणना केली जाते. गोयल यांनी सोमवारी रात्री संपत्ती दान करण्याची घोषणा केली. ही बातमी शहरात आगीसारखी पसरली. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच त्यांच्या घरी लोकांची गर्दी जमली होती. त्यांनीही मुक्तहस्ते दान केले.

Story img Loader