रस्त्यावरून वाहन चालवताना निमयांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते. कारण चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे नियम तयार केलेले असतात. अशावेळी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतात. मात्र, अनेकदा पोलिस अधिकारीच वाहतूक नियमांना पायदळी तुडवत बिनधास्तपणे प्रवास करताना दिसतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पोलिस अधिकारी रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन पोलिस बाईकवरून कुठेतरी जात असल्याचे दिसत आहे. यावेळी दोघांपैकी एकानेही हेल्मेट घातलेले नाही. हे पाहून बाईकवरून रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेने त्यांना हेल्मेट कुठे आहे, असा प्रश्न विचारला. ती सातत्याने त्यांना हेल्मेटबाबत विचारत राहिली, मात्र पोलिस कोणतेही उत्तर न देता तेथून निघून गेले. यावेळी महिलेच्या मागे बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ येथे पाहा
हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स (पूर्वी ट्विटर) पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ गाझियाबादचा असल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी पोलिसांच्या या कृतीवर ताशेरे ओढले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले- पोलिसांचाच बँड वाजला, खूप छान आहे, हे करायलाच हवे. यावर दुसऱ्या एका युजरने दावा केली की, हा व्हिडीओ जुना आहे, पण तो खरा आहे. तिसऱ्या युजरने लिहिले, जर त्या महिलेच्या जागी एखादा मुलगा असता तर दोघांनी त्याला थांबवून आधी मारहाण केली असती.