Groom Shot His Friend In His Marriage: जसं लग्न तशा परंपरा आणि प्रथा…कुणी ढोल ताशांच्या गजरात वरात काढतं तर कुणी डीजेच्या गोंगाटात…काही जण तर लग्नात फायरींग करत जल्लोष करताना तुम्ही पाहिले असेल. लग्नात फायरींग करताना अनेकांचे जीव गेल्याच्या घटना घडल्या असताना काही महाभाग यातून कसलाच धडा घेत नाहीत. अशीच एक घटना सध्या चर्चेत आलीय. लग्नात उत्साहाच्या भरात नवरदेवाने केलेल्या फायरींगमुळे एकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव मोठ्या शानमध्ये घोडागाडीवर उभा आहे. त्याच्या हातात पिस्तूल दिसत असून तो उत्साहाच्या भरात हवेत फायरींग करतो. या नवरदेवाचं नाव मनिष मधेशीया असं आहे. लग्नाची वरात घेऊन तो नवरीच्या दारी आला होता. सगळीकडे वरीचा जल्लोष सुरू असताना नवरदेवाने हवेत फायरींग करून पिस्तूल खाली करताच ट्रिगर दाबला गेला आणि जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या कपाळावरून गोळी गेली. गोळी लागल्याने तो जमिनीवर पडला. हे पाहून सारेच जण घाबरून गेले. हा व्यक्ती सैन्यात शिपाई असून बाबूलाल यादव असं त्यांचं नाव आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे ज्या पिस्तूलमधून नवरदेवाने हवेत फायरींग केली होती ती पिस्तूल मृत लष्करी जवान बाबूलाल यांचीच होती.
आणखी वाचा : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला उत्तर देणारा राज ठाकरेंचा जुना VIDEO VIRAL
ही घटना उत्तर प्रदेशमधल्या सोनभद्र जिल्ह्यात घडली आहे. बाबूलाल यादव हे काही दिवसांपूर्वीच सुट्टी घेऊन घरी आले होते. त्यांचा मित्र मनिष मधेशीया याचं लग्न रॉबर्टसगंज कोतवाली भागातील ब्राह्मणनगर येथील गेस्ट हाऊसमध्ये होणार होते. त्याच्या लग्नासाठी तो इथे आला होता. पण लग्नात आल्यानंतर मित्राच्या हातून आपला मृत्यू होईल, याची त्याने कल्पना देखील केली नसेल. ही घटना २१ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी बाबूलालला रुग्णालयात नेले, तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, मृत्यूची माहिती मिळताच सोबत आलेल्या लोकांनी पळ काढला. यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या लोकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : सुट्टी न घेता सलग २७ वर्ष काम करणाऱ्या बर्गर किंग कर्मचाऱ्याला मिळाली ‘ही’ अनोखी भेट!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : कुत्रा-कुत्रीचं अनोखं लग्न, अत्यंत सुंदर असा VIRAL VIDEO एकदा पाहाच
नवरदेवाशिवाय नवरी सासरी आली
पोलिस जेव्हा लग्न समारंभात पोहोचले तेव्हा जयमालाचा कार्यक्रम आधीच झाला होता. अजून फेऱ्या बाकी होत्या. पोलिसांनी मनीषला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. नातेवाईकांनी सांगितले की, काही वेळाने पोलीस मनीषसोबत लग्नाच्या घरी पोहोचले. फेऱ्याची विधी पूर्ण झाल्यानंतर मग त्याला पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरी नवरदेवाशिवाय सासरच्या घरी गेली.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : अयोध्येच्या सरयू नदीत अंघोळ करताना पत्नीला केलं ‘KISS’, लोकांनी केली बेदम मारहाण
गोळीबारावर बंदी असतानाही लोक हटत नाहीत. हर्ष गोळीबारात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे, मात्र त्यानंतरही गोळीबार सुरूच आहे. असाच एक प्रकार यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यात समोर आला आहे, जिथे वॅगनवर बसलेल्या वराने पिस्तुलाने गोळीबार केला आणि त्याच्या मित्राचा गोळी लागल्याने मृत्यू झाला.