भारत असा देश आहे जिथे बुद्धिमान लोकांची काहीच कमतरता नाही. आपली बुद्धीमत्ता, कौशल्यांच्या जोरावर भारतीयांनी सातासमुद्रापलीकडे भारताची ख्याती पोहचवली आहे. कला, तंत्रज्ञान, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात भारतीयांनी मोलाची कामगीरी केली आहे. येथे प्रत्येक गावात एक असामान्य व्यक्तीमत्त्व दडलंय. असेच एक गाव आहे जे आयपीएस, आयएएस आणि पीसीएस अधिका-यांचे गाव म्हणून ओळखले जाते. फक्त २०५ कुटुंब असलेल्या या गावात ४० हून अधिक आयपीएस, आयएएस आणि पीसीएस अधिकारी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : म्हणून येथे ‘त्या’ बुलेटची पूजा केली जाते

लखनऊपासून २४० किलोमीटर दूर माधोपट्टी नावाचे गाव आहे. हे गाव अधिका-यांचे गाव म्हणून ओळखले जाते. जौनपुर जिल्ह्यातील या गावात सर्वाधिक आयएएस, आयपीएस आणि पीसीएस अधिकारी आहेत. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात हे अधिकारी कार्यरत आहे. या गावाची साक्षरताही इतर गावांच्या तुलनेत अधिक आहेत. या गावातील ६२% अधिक लोक हे साक्षर आहेत. या गावातून आतापर्यंत ४७ आयएएस, आयपीएस आणि पीसीएस अधिकार बाहेर पडले आहेत. इतकेच नाही तर या गावातील इतर मुले हे बँक आणि अन्य बड्या पदावर कार्यरत आहेत. या गावातून १९१४ मध्ये मुस्तफा हुसैन हे पहिल्यांदा पीसीएस परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा आदर्श घेत या गावातील विद्यार्थी आयएएस, आयपीएस या स्पर्धा परिक्षांना आवर्जुन बसतात. १९५२ मध्ये इंदु प्रकाश सिंह हे आयएएस झाले. त्यांनी आपल्या यशाने येथल्या अनेक तरुणांना प्रेरणा दिली.

वाचा : त्याने ७३५ भटक्या कुत्र्यांना दिले जीवनदान

आज या गावातील घराघरातील एक तरी विद्यार्थी पदवीधर आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागात येथील तरूण, तरुणी कार्यरत आहेत. खरे तर जौनपुर जिल्ह्यातील अनेक गावे गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहे. पण या सगळ्याहून माधोपट्टी हे गाव वेगळे आहे. या गावाने आणि येथील तरूणांनी येणा-या पिढीपुढे नवा आदर्श घालून दिला आहे.