भटक्या कुत्र्यांचा त्रास हा काही नवीन नाही. अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून देशात कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. सातत्याने कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या शहरातून येत असतात. भटक्या कुत्र्यांचे हल्ले अनेकदा जीवघेणेही ठरले आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने एका मुलावर हल्ला करून चावा घेतल्याची ताजी घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने एका मुलावर हल्ला करून चावा घेतला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्यात भटके कुत्रे मुलावर हल्ला करताना आणि चावताना दिसत आहेत. यावेळी डिलिव्हरी बॉयने धाडस दाखवत मदतीसाठी धाव घेतली. डिलिव्हरी बॉयने येईपर्यंत कुत्रे मुलावर हल्ला करत राहिले. दरम्यान, डिलिव्हरी बॉय त्याच्या बचावासाठी येण्यापूर्वी आणखी काही कुत्रे त्या मुलाकडे धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. घटना राजनगर एक्स्टेंशनची आहे.
डिलिव्हरी बॉयने वाचवले प्राण
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सोसायटीच्या आवारामध्ये एकटा मुलगा उभा आहे, यावेळी ७,८ कुत्रे येतात आणि त्या मुलावर हल्ला करतात. हा मुलगा घबरुन त्यांना विरोध करतात मात्र कुत्रे एक एक करुन त्याच्या अंगावर धावून जात आहेत. या दरम्यान डिलिव्हरी बॉय आला नसता तर कुत्र्यांनी त्याला गंभीर जखमी केले असते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – नदीत उडी मारणं भोवलं; मगरीनं फुटबॉलपटूला जिवंत खाल्लं! VIDEO पाहून येईल अंगावर काटा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी डिलीव्हरी बॉयचे कौतुक केले आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांना असे एकटे न सोडण्याचाही सल्ला दिला आहे.