Snake viral video: सापाच्या नावाने जवळ-जवळ सगळेच घाबरतात. फक्त प्राणी प्रेमीच त्यांच्या जवळ जाण्याची हिंमत करु शकतात. कारण सापाचा एक दंश कोणालाही जीवेमारण्यासाठी पुरेसा असतो. अशाच जरा कल्पना करा की याच सापाने तुमच्या पायाला पकडून ठेवलंय..कल्पनाही करु वाटत नाही ना. मात्र हे खरंच एका महिलेसोबत घडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशातील महोबा येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोब्रा एका महिलेच्या पायाभोवती गुंडाळलेला दिसत आहे. तब्बल तीन तास साप महिलेच्या पायाभोवती गुंडाळला होता आणि सापापासून वाचण्यासाठी महिला भगवान शंकराची पूजा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ३ तास सापाने महिलेच्या पायाला वेढा घातला होता मात्र महिलेला इजा केली नाही. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

महिलेच्या पायाला गुंडाळून ३ तास बसला होता कोब्रा

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील महोबाच्या दहरा गावातील आहे, जिथे एका महिलेच्या पायाभोवती साप गुंडाळलेला दिसत आहे. ही महिला तिथेच बसून साप जाण्याची वाट पाहत आहे. सुमारे तीन तास हा साप महिलेच्या पायाभोवती गुंडाळून बसला होता. या दरम्यान ही महिला भगवान शंकराची पूजा करत आहे. सापाने या महिलेला कोणतीही इजा केली नाही, दरम्यान काहीवेळाने आजुबाजूच्या लोकांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेले पोलीस कर्मचारीही परिस्थिती पाहून आश्चर्यचकित झाले.यावेळी महिलेच्या पायाभोवती साप गुंडाळला होता आणि महिला हात जोडून बसली होती. पोलिसांनी सर्पमित्रांना पाचारण केले आणि सापाला पकडून जंगलात सोडण्यात आले. सुमारे तीन तास हा साप महिलेच्या पायाभोवती गुंडाळला होता पण त्याने महिलेला कोणतीही इजा केली नाही. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – CCTV VIDEO: संतापजनक! आधी ओव्हरटेक नंतर डॉक्टरला थेट कारच्‍या बोनेटवर नेले फरफटत

एका ट्विटर युजरने व्हिडिओ शेअर करत लिहिले, ‘मला सापाच्या नावाचीही भीती वाटते, ती तीन तास सापासोबत कशी बसली?’ दुसऱ्या ट्विटर यूजरने लिहिले की, ‘महिलेने सापासमोर हात जोडले आणि सापाने तिला चावले नाही. हे हात जोडल्यामुळे नाही तर महिलेच्या संयमामुळे घडले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh woman calmly prays to lord shiva as king cobra wraps itself around her leg in mahoba snake video viral srk