घरची परिस्थिती साधारण…भरपूर शेती…कामेही तितकीच अफाट….दहावीचं वर्ष असल्यानं अभ्यासाचीही चिंता…पण शेतातलं काम केलंच पाहिजे याची पूर्णपणे जाणीव त्याला होती. दिवसभर शेतात काम करायचं आणि वेळ मिळेल तसा अभ्यास करायचा असा त्याचा दिनक्रम. शेतात राबूनही न थकता तो दिवसातील दहा-दहा तास अभ्यास करायचा. त्याने केलेले कष्ट, केलेली मेहनत याचं फळ अखेर त्याला मिळालं. होय, ही यशोगाथा आहे उत्तराखंडमधील शांती प्रकाश या मुलाची. त्याने दहावी परीक्षेत तब्बल ९४.६ टक्के गुण मिळवले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही यशाचं शिखर गाठता येतं, हेच त्यानं आपल्या कर्तृत्त्वाने दाखवून दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उत्तराखंडच्या मातीतल्या मुलानं ही कमाल केली आहे. मागासलेला भाग असतानाही सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल थलीसैणचा विद्यार्थी असलेल्या शांती प्रकाश याने दहावी परीक्षेत ९४.६ टक्के गुण मिळवले आहेत. ही कामगिरी करून शांती प्रकाशनं आपली शाळा, नातेवाईक आणि आपल्या कुटुंबीयांचं नाव मोठं केलं आहे. शांती प्रकाश थलीसैणमधील कैन्यूर गावात राहतो. त्याचे वडील बलवीर सिंह हे थलीसैणच्या सरकारी महाविद्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. मुलानं मिळवलेल्या या यशामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शांती प्रकाशनं या यशाचं श्रेय आपल्या शिक्षकांना आणि वडिलांना दिलं आहे. आम्ही चार भाऊ आणि एक बहिण आहे. शेती असल्यानं तिथं खूप काम करावं लागतं. शेतीचं काम करत असतानाच दिवसातील १० तास अभ्यास करत होतो, असं शांती प्रकाशनं सांगितलं. शांती प्रकाशला मेहनत आणि कष्टाचं फळ मिळालं आहे. गणित विषय थोडा कच्चा असल्यानं त्यानं खासगी शिकवणी लावली होती. याच गणित विषयात ९४ गुण मिळाले. तसेच सोशल सायन्समध्ये १०० पैकी ९९ गुण, हिंदीत ९६ आणि संस्कृतमध्ये ९४ गुण मिळाले आहेत. शांती प्रकाशनं या कामगिरीमुळं इतर मेहनती विद्यार्थ्यांसमोरही आदर्श निर्माण केला आहे.