हिमाचल प्रदेशात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसानंतर आता नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याचे भयानक व्हिडिओ समोर येऊ लागले आहेत. राज्यातील मंडी जिल्ह्यातील औट येथे ५० वर्षे जुना पूल वाहून गेला. पूल वाहतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये काही सेकंदात संपूर्ण पूल पाण्यात वाहून जाताना दिसत आहे. यामध्ये पूल वाहून जात असताना लोक ओरडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्याच वेळी, कुल्लू, कसोल या पर्यटननगरीतील पार्किंगमधून १० वाहने पार्वती नदी कसोलमध्ये वाहून गेली. ही वाहने कासोल येथील महामार्गाच्या कडेला उभी करण्यात आली होती. तसेच नालागढमधील हरियाणा-हिमाचल बड्डीला जोडणारा माधवाला पूलही वाहून गेला आहे. राष्ट्रीय महामार्ग पिंजोर बड्डी रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. पुलावर दोन्ही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.दरम्यान कुल्लू जिल्ह्यातील के छरुडू येथे बियास नदीच्या मध्यभागी अडकलेल्या ९ पैकी ५ जणांची सुटका करण्यात आली आहे. उर्वरित चार जणांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम काम करत आहे. मनाली ते कुल्लू दरम्यान वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. लेह मनाली महामार्गही ठप्प झाला आहे.

water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार

२४ तासात ५ जणांचा मृत्यू

दरम्यान मुसळधार पावसामुळे मनाली आणि कुल्लू येथील अनेक ठिकाणी जमीन खचली आहे. यामुळे कुल्लू मनाली आणि मनालीहून अटल बोगदा आणि रोहतांगदरम्यानचा रस्ता बंद करण्यात आला आहे. येथील नदी आणि नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे सरकारने सर्व शाळा आणि शिक्षण संस्थांना १० आणि ११ जुलैला सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात गेल्या २४ तासात ५ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कासवाला साप खाताना पाहिलंय का? जबरदस्त शिकारीचा Viral video पाहुन म्हणाल हे कसं शक्य आहे…

हे राष्ट्रीय महामार्ग बंद

शनी मंदिर औटजवळ जमीन खचल्याने आणि दरड कोसळल्याने मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. कटौल येथून जाणारा मंडी-कुल्लू मार्गही बंद झाला आहे. पंडोह-गोहर-चैलचौक-बग्गी-सुंदरनगर रस्ता सुरु करण्यात आला आहे, पण येथून जड वाहतूक बंद आहे. 

Story img Loader