Viral video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा प्राण्यांचा जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. दरम्यान कुत्र्याचा फडशा पाडणारे बिबटे तुम्ही अनेक पाहिले असतील. पण बिबट्याच्या तावडीतून एक नव्हे तर ३, ते ४ कुत्र्यांनी स्वतःला आश्चर्यकारकरीत्या वाचवलंय. ही थरारक आणि चकीत करणारी घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
अनेकदा बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी आपल्या जवळच्या परिसरात फिरत असल्याची बातमी कळाली तरी लोकांचा थरकाप उडतो. या हिंस्त्र प्राण्यांना पाहिल्यावर लोकच काय तर प्राणीदेखील स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळत सुटतात. पण, नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये बिबट्यालाच घाम फुटलाय.
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं
बिबट्याच्या शिकारीचे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मानवी वस्तीत घुसून बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची प्रकरणं कमी नाहीत. उत्तराखंडमधील नैनिताल येथेही शिकारीच्या प्रयत्नात बिबट्याने कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बिबट्या घरात शिरला. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एका घरात बिबट्या शिरल्याचे दिसत आहे. मात्र दोन वेळा प्रयत्न करूनही त्याला कुत्र्यांची शिकार करता आली नाही. तीन चार कुत्रे एकत्र आल्यावर मात्र बिबट्या पळून गेला. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच काही कुत्र्यांनी हिम्मत दाखवून बिबट्याला सळो की पळो करुन सोडलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> याला म्हणतात पुणेकरांचा धाक; पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहलं असं काही की PHOTO पाहून पोट धरुन हसाल
हा सगळा थरारक प्रकार एका व्हिडीओत रेकॉर्ड झाला आहे. इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. जंगलचा राजा पळून गेला असे कॅप्शन पोस्टला देण्यात आले असून व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “कुत्र्याच्या जिद्दीला सलाम”, तर दुसरा युजर म्हणतो, “भीतीची भीती कशाला.”
© IE Online Media Services (P) Ltd