सततच्या पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गालगत लांबागड नाल्याजवळ दरड कोसळल्याने कार आणि त्यातील प्रवाशांची सोमवारी बीआरओ (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) ने सुटका केली.एएनआयच्या मते, डेबरीजने उत्तराखंडचा ऋषिकेश -बद्रीनाथ महामार्ग रोखला आहे आणि सिरोबागडमध्ये डझनभर वाहनांचे नुकसान केले आहे. खानखरा-खेडाखल-खिरसूचा लिंक रोड देखील भूस्खलनामुळे बंद झाला आहे.गेल्या चार दिवसांपासून या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन झाले.
सावधगिरीची पावले
भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. “आयएमडीने सोमवारी सकाळी जारी केलेल्या दैनंदिन हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे की,” उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. “
( हे ही वाचा: प्रतीक्षा संपली! बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात झाली लॉंच; जाणून घ्या किंमत )
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस प्रशासन आणि सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व स्थानिक रहिवाशांना आणि प्रवाशांना सतर्कता, नदी नाल्यांपासून अंतर आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उत्तराखंडला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना हवामानाचा इशारा लक्षात घेऊन त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याची विनंती केली जाते आणि या कालावधीत प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
( हे ही वाचा: अवघ्या काही सेकंदात एकाच वेळी चीनमधल्या १५ इमारती झाल्या जमीनदोस्त; पाहा व्हायरल व्हिडीओ)
उत्तराखंडमध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसाने नेपाळमधील तीन मजुरांसह पाच जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. पौरी जिल्ह्यातील लॅन्सडाऊनजवळ समखल येथे मजूर तंबूत थांबले होते, जेव्हा पावसामुळे वरील शेतातून ढिगारा खाली वाहून गेला, ते जिवंत गाडले गेले, असे जिल्हा दंडाधिकारी विजयकुमार जोगदांडे यांनी पीटीआयला सांगितले.
अन्य एका घटनेत, चंपावत जिल्ह्यातील सेलखोला येथे दरड कोसळून त्यांचे घर कोसळून दोन जण ठार झाले, असे येथील राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने सांगितले. उत्तराखंडमधील वर्ग १ ते १२ पर्यंतच्या सर्व शाळा सोमवारी बंद राहिल्या, तर नंदा देवी बायोस्फीअर रिझर्व आणि विविध वन विभागांसह राज्यातील उच्च उंचीच्या भागात ट्रेकिंग, पर्वतारोहण आणि कॅम्पिंग उपक्रमांवर बंदी घालण्यात आली.