सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये कधी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत भन्नाट डान्स केल्याचे असतात. तर कधी आपल्या आवडत्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी एखादं सरप्राइज दिल्याचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत मात्र, सध्या गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला संताप आल्याशिवाय राहणार नाही. हो कारण एका महिला शिक्षेकेने विद्यार्थिनीने भांडी घासली नाहीत म्हणून तिला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती एका हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेने आपल्या विद्यार्थिनीला खरकटी भांडी धुण्यासाठी बळजबरी केली. मात्र विद्यार्थिनीने भांडी धुण्यास नकार दिल्यामुळे शिक्षिकेला राग आणि रागाच्या भरात तिने विद्यार्थिनीला मारहाण केली. या घटनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या शिक्षिकेवर कठोक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या व्हिडीओची सत्यता तपासल्यानंतर शिक्षण विभागाने पौरी जिल्ह्यातील देवला पौखल या भागातील ही घटना असल्याचं सांगितलं आहे.

हेही पाहा- कौतुक करावं की परिस्थितीची कीव? तरुणाच्या जगण्याचा संघर्ष पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न, Video एकदा पाहाच

विद्यार्थ्यींनीलाअमानुष मारहाण –

कथित माहितीनुसार, गुरुराम राय इंटर कॉलेजमध्ये आयोजित एनएसएस कॅम्पदरम्यान एका विद्यार्थिनीला शाळेतील महिला शिक्षकाने बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ कोणीतरी इंटरनेटवर पोस्ट करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडीओत सुरुवातीला शिक्षिकेने विद्यार्थिनीला खूप चापटी मारल्याचं दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षिकेने विद्यार्थिनीचा गळा आवळल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

Koo App
जूठे बर्तन न धुलने पर शिक्षिका ने छात्रा कोबेरहमी से पीटा, वीडियो वायरल
View attached media content
– Alkesh Kushwaha (@alkeshkushwaha) 13 Jan 2023

भांडी धुण्यास नकार दिला म्हणून मारहाण –

हेही पाहा- Video: स्टाईलमध्ये चहाचं पॅकिंग करणं पडलं महागात; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

स्थानिक काही लोकांनी सांगितलं की, ‘पाणी नसल्यामुळे विद्यार्थिनीने भांडी धुतली नव्हती. मात्र, याचाच राग आलेल्या शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली.’ शिक्षिकेच्या या गैर वर्तवणुकीचा व्हिडीओ कोणीतरी रेकॉर्ड केला होता, जो सध्या व्हायरल होत आहे. शिवाय या प्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. आरोपी शिक्षेकेविरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.