Uttarakhand tunnel: उत्तराखंडमधील एका घटनेने संपूर्ण देश हादरला होता. मंगळवारी रात्री तब्बल १७ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ४१ मजुरांना बोगद्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, यामध्ये बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कामगार आतमध्ये अडकले होते, मात्र बाहेर त्यांच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला होता. अशाच एका कामगाराच्या वडिलांचा भावूक करणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. आपला मुलगा अखेर सुखरुप बाहेर आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलगा बोगद्यातून बाहेर आल्यानंतर वडील भावूक झाले आहेत. या वडिलांचे बोलणे ऐकून सर्वांचे डोळे पाणावले आहेत. या कामगाराच्या वडिलांना जेव्हा विचारलं की तुमचा मुलगा सुखरुप बाहेर आला आहे आता तुम्हाला कसं वाटतंय? यावर त्यांनी “माझं रोपटं वाचलं अजून काय पाहिजे” असं उत्तर दिलं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. यावर ते “हे तर आनंदाचे अश्रू आहेत” असं म्हणाले. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @DrRPNishank नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला “वडिल आपला मुलगा बाहेर पडल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहे.” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हा व्हिडिओ लोकांच्या मनाला भिडणारा आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ‘भावनिक व्हिडिओ.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘अखेर मृत्यू हरला जिद्द जिंकली!

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Uttarakhand tunnel: “अन्नाचा पहिला घास खाल्ला आणि…” ४०० तास बोगद्यात अडकलेल्या कामगारानं सांगितला “तो” अनुभव

कोणत्या यंत्रणा बचाव कार्यात सहभागी?

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO), नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NHIDCL), जे प्रकल्प बांधत आहेत आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP-Indo Tibetan Border Police) यासह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी होत्या.

Story img Loader