आपल्या हिंदू धर्मात माणसाच्या मृत्यूनंतरही अनेक क्रिया कराव्या लागतात. यामध्येच तेराव्याच्या कार्यक्रमाचाही समावेश आहे. माणसाच्या मृत्यूनंतर १३ दिवसन्नी हा कार्यक्रम केला जातो. आत्तापर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तेराव्याचा कार्यक्रम पाहिला किंवा ऐकला असेल. मात्र तेराव्या कार्यक्रमाचे एक विचित्र प्रकरण यूपीच्या प्रतापगडमध्ये समोर आले आहे. प्रतापगडमध्ये कोंबड्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालकाने त्या कोंबड्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले आणि १३ दिवसानंतर लोकांना तेराव्याचे जेवणही खाऊ घातले. या कोंबड्याचे नाव ‘लाली’ असे होते. त्याच्या तेराव्याला गावातील ५०० लोकांना जेवू घालण्यात आले होते.
प्रतापगड जिल्ह्यातील बेहदौल कला गावात डॉ. शालिकराम सरोज एक क्लिनिक चालवतात. त्यांनी एक शेळी आणि एक कोंबडा पाळला होता. त्यांचा आपल्या प्राण्यांवर खूपच जीव होता. ८ जुलै रोजी डॉ. शालिकराम यांच्या शेळीच्या करडुवर कुत्र्याने हल्ला केला, हे पाहून लालीची कुत्र्याशी झटापट झाली. शेळीचे करडू तर वाचले पण कुत्र्याच्या हल्ल्यात लाली स्वतः गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर ९ जुलै रोजी संध्याकाळी लालीचा मृत्यू झाला.
CCTV : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स…
कोंबडीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह घराजवळ पुरण्यात आला. इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं, पण डॉ. शालिकराम यांनी प्रथेनुसार कोंबडीचा तेरावा करणार असल्याचे जाहीर केल्यावर लोकांना धक्काच बसला. यानंतर अंत्यसंस्काराचे विधी होऊ लागले. मुंडण करण्यापासून ते इतर विधी पूर्ण झाले. बुधवारी सकाळपासूनच आचाऱ्यांनी तेरवीच्या जेवणाची तयारी सुरू केली.
सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत पाचशेहून अधिक लोकांनी तेराव्यापर्यंत पोहोचून भोजन केले. त्याची चर्चा परिसरात दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. या प्रकरणाबाबत शालिकराम सरोज यांची मुलगी अनुजा सरोज हिने सांगितले की, लाली कोंबडा माझ्या भावांसारखा होता. त्यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस घरात अन्न शिजवले नाही. घरात शोकाकुल वातावरण होते. रक्षाबंधनालाही आम्ही त्यांना राखी बांधायचो. तिच्या तेराव्याचा कार्यक्रम करताना 500 हून अधिक लोकांना जेवण देण्यात आले. जेवणात पुरी, भाजी, डाळी, भात, कोशिंबीर, चटणी असे पदार्थ केले. या कार्यक्रमाला गावातील सर्व लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.
Optical Illusion: ‘या’ फोटोमध्ये लपला आहे वाघ; तुम्हाला सापडला का?
सुरुवातीला गावकऱ्यांचा विश्वास बसला नाही, पण शालिकरामने ४० हजार रुपये खर्च करून तेराव्याचा कार्यक्रम केला तेव्हा मालकाचे कोंबडीवरील प्रेम पाहून लोकांनी त्याचे कौतुक केले. डॉ. शालिकरामने सांगितले की, हा कोंबडा आमच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे. तो घराचे रक्षण करत असे, प्रत्येकाचे त्याच्यावर अतूट प्रेम होते. त्यांच्या निधनानंतर केवळ आत्मशांतीसाठी आम्ही तेराव्याचा कार्यक्रम केला.