Uyi Amma Dance Video Viral: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. प्रसिद्धी किंवा स्वत:च्या आनंदासाठी अनेक लोक मेट्रोत, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर डान्स करताना आपल्याला दिसतात.

सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवडचं ‘उई अम्मा’ हे गाण जोरदार व्हायरल होतंय. कॉन्टेन्ट क्रिएटर्ससह अभिनेत्री, अभिनेतेदेखील या गाण्यावर रील्स करत डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर याआधी ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘तांबडी चांबडी ही गाणी व्हायरल झाली होती. यावरदेखील अनेकांनी रील्स बनवल्या होत्या.

गेल्या काही महिन्यांपासून या गाण्याने सगळ्यांना वेड लावलं आहे. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसतायत. सध्या याच गाण्यावर एका महिलेचा डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो,की एक महिला डान्स करताना दिसतेय. उई अम्मा या बॉलीवूड गाण्यावर ही महिला थिरकताना दिसत आहे. अगदी जबरदस्त डान्स करत तिने सगळ्यांनी मने जिंकली आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @lady_and_the_spices या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “जाड बारीक असं काही नसतं ज्यांना छान नाचता येतं” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला १ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खरंच खूप छान” तर दुसऱ्याने “काय मस्त डान्स केला आहे ताईंनी” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “पण नाव फक्त जाड माणसांनाच ठेवली जातात हेदेखील तितकंच खरं आहे” तर एकाने “जबरदस्त” अशी कमेंट केली.