Viral Video : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वडापाव विकणारी दिल्लीची एक तरुणी चांगलीच चर्चेत आहे ही तरुणी आणि तिचा पती दिल्लीत वडापाव विकतात. कोणी तिच्या वडापावचे गुणगाण गात आहे तर कोणी तिच्या सुंदरतेचे कौतुक करत आहे. तिच्या स्टॉलवर वडापाव खाण्यासाठी लोकं गर्दी करताहेत. या तरुणीचे नाव चंद्रिका गेरा दीक्षित आहे.
काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत होती. तिचा स्टॉल हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले होते. आता पुन्हा तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका महिलेबरोबर भांडताना दिसत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही वडापाव विकणारी तरुणी महिलेबरोबर का भांडत आहे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला वडापाव विकणाऱ्या तरुणीचा नवरा आणि कुटूंब एका महिलेबरोबर भांडताना दिसत आहे. वडापावसाठी लोकांची एवढी गर्दी होत आहे त्यामुळे तासन् तास ट्रॅफिक जाम आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका महिलेने यावर संताप व्यक्त केला आहे आणि यामुळेच या महिलेचा वडापाव विकणारी तरुणी आणि तिचे कुटूंबाबरोबर वाद झाला आणि ते एकमेकांबरोबर भांडायला लागले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

तरुणीचा रडतानाचा व्हिडीओ झाला होता व्हायरल

काही दिवसांपूर्वी या तरुणीचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिचा स्टॉल हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तिने केला होता. ती त्या व्हिडीओत फोनवर बोलत रडत होती. रडत रडत ती फोनवर कोणाला तरी सांगत होती की त्यांनाफक्त पैसे पाहिजेत. त्यांना ३०,०००- ३५००० रुपये आदल्या दिवशी दिले आहेत. सगळा पैशांचा खेळ आहे.”

कोण आहे ही तरुणी?

चंद्रिका गेरा दीक्षित ही एक दिल्लीत वडापाव विकणारी तरुणी आहे. खूप कमी दिवसांमध्ये ती वडापावमुळे लोकप्रिय झाली. ती आधी हल्दीराममध्ये काम करायची. जरी ती मुंबईचा वडापाव दिल्लीमध्ये विकते तरी ती दिल्लीची नाही आणि मुंबईची पण नाही. ती मुळची इंदौर मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे. मुलाची तब्येत ठीक नव्हती म्हणून तिला आणि तिच्या नवऱ्याला नोकरी सोडावी लागली. आता दिल्लीत नॅशनल कॅपिटल रिजनच्या सैनिक विहार येथे ही महिला तिच्या नवऱ्यासह वडापावचा गाडा चालवते.