गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर सुरूच ठेवला आहे. ओढा, नद्या ओसंडून वाहत आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. मैदांनामध्ये पाणी साचले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित जागी नेले जात आहे. अशा स्थितीमध्ये बडोदा येथईल महाराजा सयारीजाराव युनिवर्सिटीमध्ये एक महाकाय मगर आढळून आली आहे. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मगरीला पकडले आहे. मगरीला पकडतानाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मगर पकडतानाचा व्हिडिओ पहा

वन विभागाची टीम सर्वप्रथम मगरीचे तोंड प्रथम दोरखंडाने बांधते. त्यानंतर मगरीच्या अंगावर हिरव्या रंगाचे कापड टाकून झाकले जाते. त्यानंतर काही वेळाने मगर जेव्हा शांत झाली तेव्हा तिच्या अंगावर ८ जणांना बसवण्यात येते. बचाव पथकाचे लोक एक, दोन, तीन… म्हणत सर्वजण एकाच वेळी मगरीच्या अंगावर बसतात. सर्व लोकांना मगरीच्या जबड्यापासून शेपटीपर्यंत बसवण्यात येते. त्यानंतर काही वेळाने सर्वजण मिळून मगरीला उचलतात आणि एका ट्रॉलीमध्ये टाकतात. बचाव पथकाचा हा थरारक Video पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

हेही वाचा – कृष्ण जन्माची आठवण करून देणारा प्रसंग! पुराच्या पाण्यातून चिमुकल्याला वाचवले, Viral Video एकदा बघा

गुजरातमध्ये ‘जलप्रलय’

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे गुरुवारी ११ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे राज्यात २९ जणांना जीव गमवावा लागला आहे.२२ जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाचीही मदत घेण्यात आली आहे. काही लोकांना एअरलिफ्ट करून इतर ठिकाणी सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

हेह वाचा –‘मैया यशोदा’ गाण्यावर राधा कृष्णच्या वेशभूषेत चिमुकल्यांनी केले गोंडस नृत्य,Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

नागरिकांनी सांगितले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सेना, भारतीय वायुसेना आणि तटबंदीच्या रक्षकांकडून बाधीत क्षेत्रामध्ये बचाव मोहिम चालू आहे, आता जवळपास १७,८०० लोक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत आणि २,००० लोकांना वाचवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील १४० जलाशय आणि धरणे आणि २४ नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक आणि रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. २०६ धरणांपैकी १२२ धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने त्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.