गुजरातमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साप दंश केल्याच्या रागातून एका व्यक्तीने सापाचा चक्क सापाचा चावा घेतला. यामध्ये साप आणि माणूसाचाही मृत्यू झाला आहे. गुजरातमधील अजन्वा या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शनिवारी ४ मे रोजी अजन्वा गावातील ७० वर्षीय पर्वत गाला बारिया यांना सापाने दंश केला. पर्वत हे व्यवसायाने शेतकरी आहेत. सापाने दंश केल्यानंतर रागामध्ये त्यांनीही सापाचा चावा घेतला. उपचारासाठी त्यांना गोध्रा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. पर्वत यांनी चार तास मृत्यूशी झुंज दिली मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू दिला.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सापाने दंश केल्यानंतर पर्वत यांनी उल्टी करत सर्व विष सापावर टाकण्याचा प्रयत्न केला. बदल्याच्या रागातून पर्वत यांनी सापाला पकडून चावा घेतला. तेथे उपस्थित असलेल्या एका नातेवाईकाने याची माहिती पर्वत यांच्या घरी दिली. कुटुंबियांनी मेलेल्या सापाला जाळले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना जवळील लुनावडा रूग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना गोध्रा रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. पर्वत यांनी चार तास मृत्यूशी झुंज दिली मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.