Vaikuntha Ekadashi Vrat 2025: हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला खूप महत्वपूर्ण मानले जाते. या दिवशी अनेक विष्णू भक्त उपवास करतात, त्यांची पूजा-आराधना करतात. एकादशी तिथी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष अशा दोन्ही पक्षात साजरी केली जाते. सध्या पौष महिना सुरू असून या महिन्यामध्ये वैकुंठ एकादशीचे व्रत केले जाईल. या एकादशीला पुत्रदा एकादशीदेखील म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या एकादशीला श्री विष्णूंची पूजा-आराधना केल्याने आयुष्यातील सर्व सुख प्राप्त होते.
दरम्यान, सध्या गूगल ट्रेंडवरदेखील वैकुंठ एकादशी २०२५ हा कीवर्ड ट्रेंड होत आहे.
वैकुंठ एकादशी २०२५ शुभ मुहूर्त आणि तिथी
पंचांगानुसार, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात ९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी होईल, तसेच ही तिथी १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजून १९ मिनिटांपर्यंत असेल. परंतु, उदयतिथीनुसार हे व्रत १० जानेवारी रोजी केले जाईल.
शुभ वेळ
ब्रह्म मुहूर्त – पहाटे ५ वाजून २७ मिनिटांपासून ते ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत असेल.
अभिजीत मुहूर्त – दुपारी १२ वाजून ८ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असेल.
एकादशी समाप्ती – एकादशी व्रताची समाप्ती एकादशीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते. पंचांगानुसार, वैकुंठ एकादशीची समाप्ती ११ जानेवारी रोजी सकाळी ०७ वाजून १५ मिनिटांपासून ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत आहे.
वैकुंठ एकादशी अध्यात्मिक महत्त्व
पौराणिक कथेनुसार, सुकेतुमान नावाचा एक राजा होता, ज्याला मुलबाळ नव्हते, त्यामुळे राजा नेहमी चितेंत असायचा. या दुःखात राजा त्याच्या राज्याचा त्याग करून जंगलात गेला. यादरम्यान त्याची भेट काही ऋषीमुनींशी झाली. यावेळी राजाने त्याची व्यथा ऋषीमुनींना सांगितली. त्यावेळी ऋषीमुनींनी त्याला पुत्रदा एकादशी करण्यास सांगितले. हे व्रत केल्यानंतर त्याला पुत्र प्राप्ती झाली.
वर दिलेल्या गूगल ट्रेंड्सच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता, अठ्ठेचाळीस तासांमध्ये वीस हजारांपेक्षा अधिक युजर्सनी वैकुंठ एकादशी २०२५ हा कीवर्ड सर्च केला आहे.