Valentine’s Day Wishes : १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे म्हणून ओळखला जातो. विशेषत: तरुण मंडळी आवडीने आणि उत्साहाने व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. “प्रेम म्हणजे काय असतं, तुमचं आमचं सेम असतं” अशा अनेक कविता, प्रेमावरील मेसेज, गझल, चारोळ्या फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक जण या दिवशी त्यांच्या प्रिय व्यक्तींना काही हटके मेसेज पाठवून शुभेच्छा देतात.आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रेमाचा वर्षाव करणारे सुंदर आणि हटके शुभेच्छांचे मेसेज सांगणार आहोत. हे मेसेज पाठवून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. चला तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेम काय असतं, हे मी तुझ्यापासून शिकलो
तुझ्याबरोबर घालवलेल्या क्षणात मी जीवन जगलो
तु माझी आहे, ही भावनाच सुखवून जाते,
तुझे गोड हास्य मला वारंवार तुझ्या प्रेमात पाडते.
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

प्रेम करण्यासाठी जोडीदारच का असावा,
कधी स्वत:वरही प्रेम करून बघ
प्रेमासाठी जीव द्यायची हिम्मत दाखवणारे अनेक आहेत
पण तु कधी स्वत:साठी जगून बघ..
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

Valentine Day 2024

प्रत्येकाला मिळत नाही खरे प्रेम
डाव जरी चुकला तरी येथे होतो अनेकांचा गेम
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

प्रेम म्हणजे मनाला देणारा गारवा
प्रेम म्हणजे फक्त मी आणि तू,
प्रेमाच्या दिवशी एकच गोष्ट सांगावीशी वाटते
ती म्हणजे I Love You!!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

प्रेम म्हणजे तू आणि तू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व
Happy Valentine Day

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तू नक्कीच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे…….
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

हेही वाचा : विद्यार्थ्यांनी गुरुजींबरोबर केली खोडी अन् दिले वाढदिवसाचे भन्नाट सरप्राइज, व्हिडीओ पाहून आठवेल शाळेचे दिवस

जरा एकदा प्रेम करुन बघ
जरा एकदा मनाचं ऐकून बघ
जरा एकदा मोकळा श्वास घेऊन बघ
कधी स्वत:चा विचार न करता त्याग करुन बघ
जरा एकदा प्रेम करुन बघ
Be My Valentine….

मला तुझं हसणं हवं आहे,,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तू जवळ नसतानाही,
मला तुझं असणं हवं आहे…
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

Valentine Day 2024

तु माझ्याबरोबर असण्यापेक्षा तु सुखात असणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे…
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

प्रेम म्हणजे प्रेम असतं
पण प्रत्येकाच्या आयुष्यात खरं प्रेम नसतं
Happy Valentine Day

तू नसतेस तेव्हा,
चांदण्याही काळोखात हरवलेल्या असतात.
चंद्राचं वेड नाही मला,
फक्त तु असावी शेजारी
जेव्हा तारे वाट चुकतात…
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day 2024 special best marathi wishes and poems on love share on whatsapp message whatsapp status facebook ndj