Valentine’s Day 2024 : आज १४ फेब्रुवारी हा कॅलेंडरमधील एक खास दिवस आहे; जो जगभरातील लोक व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा करतात. या दिवशी प्रेमी युगुले एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतात. एकमेकांना खास भेटवस्तू देतात. काही लोक रोमँटिक डेटवर जातात; तर काही जण आपल्या प्रेयसीला नव्याने प्रपोज करतात. त्यानिमित्ताने प्रेमी युगुल आपल्या जोडीदाराकडे त्यांच्या मनातील भावना व्यक्त करतात. व्हॅलेंटाइन डेनिमित्त सोशल मीडियावर लोक वेगवेगळे व्हिडीओ, फोटो शेअर करीत आहेत. त्याच वेळी काही जण मजेशीर पद्धतीने व्हॅलेंटाइन डे साजरा करीत आहेत आण मजेशीर मीम्स शेअर करून आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. असेच काही मजेशीर मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला तर मग पाहू व्हॅलेंटाइन डेवर व्हायरल होणारे काही भन्नाट विनोदी जोक्स आणि मीम्स.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशा प्रकारे व्हॅलेंटाइननिमित्त सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. चित्रपटातील फेमस डायलॉग, सीनवर हे मीम्स फोटो आणि व्हिडीओ तयार केले जात आहेत; ज्यावर युजर्सही भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentines day 2024 funny memes hilarious jokes singles celebrating 14 february with laughter valentines day sjr